पुन्हा राडा होणार.. पुन्हा चावडी भरणार!! BIGG BOSS मराठी सीजन 5 येतोय; जाणून घ्या कधी..?


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवर अनेक मालिका लोकप्रिय आहेत. मात्र छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चेत राहणारा कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस मराठी’. हिंदी बिग बॉसनंतर मराठीमध्ये हा कार्यक्रम सुरू झाला आणि तेव्हढ्याच ताकदीने तो प्रेक्षकांना भावला. आतापर्यंत बिग बॉस मराठीचे एकूण चार सीजन झाले आहेत. यातील प्रत्येक सीजन कमालीचा गाजला. त्यामुळे आता बिग बॉस मराठीचा पुढील सीजन कधी सुरु होणार..? याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. अशातच आता बिग बॉस मराठी सीजन ५ लवकरच सुरू होणार असल्याची कुणकुण लागली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच वाढू लागली आहे.

बिग बॉस हिंदी जसा सलमान खान होस्ट करतो आणि त्याच्याशिवाय शोला मजा नाही. अगदी तसच मराठी बिग बॉसला महेश मांजरेकरांशिवाय शोभा नाही. बिग बॉस मराठी सुरू होणार म्हटलं की पहिली चर्चा सुरू होते ती मांजरेकरांच्या चावडीची. तर बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनची आणि मांजरेकरांच्या भेटीचा आतुरता आता लवकरच संपणार आहे. कारण बिग बॉस मराठीच्या आगामी सीझनबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीझन ५ च्या सेटचं काम सुरू झालं आहे. बिग बॉस मराठीचा सीझन ४ संपल्यानंतर त्या सेटवर ‘बिग बॉस मल्याळम’ या शोचे शुट सुरू होते. बिग बॉस मल्याळम’चा नुकताच ७ जुलै २०२३ रोजी महाअंतिम सोहळा पार पडला आणि त्यानंतर आता या सेटवर ‘बिग बॉस मराठी ५’ च्या नव्या सेटचे काम सुरू झाले आहे.

रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस मराठी सीजन ५’च्या सेटचे काम या सप्टेंबरमध्ये पूर्ण होईल. त्यामुळे सप्टेंबर महिना अखेर किंवा ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला ‘बिग बॉस मराठी ५’ सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या बिग बॉस हिंदी ओटीटी सुरु आहे आणि ते संपल्यानंतर हिंदी बिग बॉसचा पुढील सीझन सुरू होईल. त्यामुळे पुन्हा एकदा बिग बॉस हिंदी आणि मराठी बिग बॉस मराठी एकमेकांसोबत क्लॅश होऊ शकतात. बिग बॉस मराठीचा आगामी सीजन कोणकोणत्या सेलिब्रिटींचा खरा चेहरा समोर आणणार..? आणि काय नवे ट्विट घेऊन येणार..? याबाबत मोठी उत्सुकता आहे.