यळकोट यळकोट जय मल्हार!! हार्दिक- अक्षया पोहोचले जेजुरी गडावर; व्हिडीओ झाला व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवर लोकप्रिय ठरलेली ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका संपली पण यातील कलाकार अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मालिकेतून अभिनेता हर्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे प्रकाशझोतात आले. राणा दा आणि पाठक बाईंची हि जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली. पुढे जाऊन ही रील लाईफ जोडी रिअल लाईफमध्येदेखील विवाहबद्ध झाली. लग्नानंतर हार्दिक आणि अक्षयाचा अनेकदा देवदर्शन करताना दिसले आहेत. आताही त्यांचा जेजुरी गडावरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

लोकप्रिय जोडी हार्दिक आणि अक्षया दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यामुळे ते नेहमीच एकेमकांसोबतचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. लग्न झाल्यापासून हार्दिक आणि अक्षय दोघेही विविध मंदिरात देवदर्शनाला जाताना दिसले आहेत. अशातच त्याचा जेजुरी गडावरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लग्नानंतर ते पहिल्यांदाच जेजुरीला गेले आहेत. त्यामुळे या व्हिडिओत हार्दिकने अक्षयाला उचलल्याचे दिसत आहे.

या व्हिडीओच्या सुरुवातीला जेजुरी गड दिसतो. त्यानंतर हार्दिक अक्षयाला उचलून गडाच्या पायऱ्या चढताना दिसतोय. पुढे हार्दिक आणि अक्षयाने मिळून देवाची पुजा आणि अभिषेक केल्याचे दिसत आहे. आपल्या सुखी संसारासाठी दोघांनीही देव मल्हारीकडे मनोभावे प्रार्थना केली. याशिवाय हार्दिकने देव मल्हारीची ४२ किलो वजनाची खंडा तलवारदेखील उचलली. यावेळी हार्दिक आणि अक्षयाला पहायला चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यांचा हा जेजुरी दर्शनाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.