स्वानंदी- आशिषची लगीनघाई! टिकेकरांच्या घरी साखरपुड्याची जय्यत तयारी; पहा मेहंदीचे खास क्षण


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते उदय टिकेकर यांची एकुलती एक लेक आणि अभिनेत्री स्वानंदी टिकेकर सध्या चांगलीच चर्चेत आहे. स्वानंदी सोशल मीडियावर फार सक्रिय असते आणि याच माध्यमातून तिने अलीकडेच आपल्या प्रेमाची कबुली देत गायक आशिष कुलकर्णीसोबतच्या रिलेशनशीपचा खुलासा केला आहे. यानंतर आता स्वानंदी आणि आशिष लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. सध्या सोशल मीडियावर स्वानंदी टिकेकरांच्या साखरपुड्याची चर्चा रंगली आहे. तिने स्वतःच मेहंदी सोहळ्याचा फोटो आणि व्हिडीओ शेअर केली आहे.

हा फोटो आणि व्हिडीओ पाहून स्वानंदी आणि आशिषने गुपचूप साखरपुडा केला का काय..? अशी चर्चा रंगली आहे. अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शुक्रवारी रात्री एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये आशिष स्वानंदीच्या गालावर किस करतोय आणि तिच्या हातावर मेहंदी दिसतेय. स्वानंदी आणि आशिषचा हा रोमँटिक फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोखाली स्वानंदीने #Engagement #Mehandi असे हॅशटॅग वापरले आहेत. याशिवाय आनंदीने तिच्या मेहंदी सोहळ्याची खास झलक व्हिडिओतून शेअर केली आहे.

या व्हिडिओमध्ये टिकेकरांच्या घरी मेहंदी सोहळ्याची सुरु असलेली तयारी दिसत आहे. फुलाफुलांची सजावट आणि बैठकीची मांडणी अतिशय सुंदर पद्धतीने केली आहे. मेहंदी सोहळ्यासाठी स्वानंदीने खास पेहराव केला आहे. ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसते आहे. या व्हिडिओत स्वानंदीच्या हातावर आणि पायावर मेहंदी काढली जात आहे.

तिच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी पाहण्यासारखा आहे. नवरी म्हणून सजताना स्वानंदीच्या चेहऱ्यावर आनंद तितकीच गुलाबी लाज दिसते आहे. याशिवाय स्वानंदीची आई शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर- टिकेकर या देखील हातावर मेहंदी लावून मस्त ठुमके लागवताना दिसत आहेत. सध्या मेहंदी सोहळ्याचे हे खास क्षण स्वानंदी आणि आशिष यांच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.