पिळगांवकर कुटुंबाची मालदीव ट्रीप; सचिन- सुप्रियाचे रोमँटिक तर श्रियाचे बिकिनी Pics व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन जोड्यांमध्ये अभिनेता सचिन पिळगांवकर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख होतो. तर बहुचर्चित अभिनेत्रींमध्ये या जोडप्याची सुंदर आणि एकुलती एक लेक श्रिया पिळगांवकरच्या नावाचा उल्लेख होतो. हे कुटुंब नेहमीच त्यांच्या उत्साहाची सोशल मीडियावर चर्चेत असतं. सध्या पिळगांवकर कुटुंब मालदीवमध्ये निळ्याशार समुद्रकिनारी सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. त्यांच्या या ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगावकरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर त्यांच्या फॅमिली मालदीव ट्रिपचे बरेच फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये सचिन आणि सुप्रिया यांचा रोमँटिक तर श्रियाचा बोल्ड अंदाज पहायला मिळतोय. श्रियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाची बिकिनी परिधान केलेली दिसत आहे. या बिकिनीतील फोटोंना तिने ‘Pinks & Blues’ असे कॅप्शन दिले आहे. तर मालदीव ट्रीपच्या फोटोंना तिने #TravelGram असा हॅशटॅग दिला आहे. नियॉन रंगाच्या मोनोकिनीमधील श्रियाचा बोल्ड लूक तर सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

पिळगांवकर कुटुंब हि ट्रिप खूपच एन्जॉय करताना दिसते आहे. सुप्रिया पिळगावकर यांनी मालदीवच्या समुद्रात जेट स्की राईड केली. शिवाय सचिन आणि सुप्रिया यांनी मालदीवच्या नयनरम्य स्थळांचा एकत्र आनंद लूटला. त्यांच्या रोमँटिक फोटोवर खूप लाईक्स आले आहेत. शिवाय अनेकांनी कमेंट करत त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. या फोटोवर अभिनेत्री अश्विनी भावे यांनी ‘Lovely Jodi’ अशी कमेंट केली आहे. पिळगांवकर कुटुंबाची ही मालदीव ट्रिप सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली असून त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत.