कोणाची निवड करेल सई..? सागर कि सावनी..? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मोठा ट्विस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवर अगदी २ महिन्यांपूर्वी सुरू झालेली ‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. मालिकेचा टीआरपी देखील चांगला आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंचनाळे यांच्या मुख्य भूमिका आहेत. अलीकडेच मालिकेने ५० भागांचा टप्पा पार केला आहे. दरम्यान या मालिकेच्या कथानकट मोठा ट्विस्ट येणार आहे. मालिकेत सागर- मुक्ता नवरा बायको असल्याचं नाटक उघड झाल्यानंतर मुक्ताच्या आईचे सागरसोबत मोठे भांडण झाले.

तर दुसरीकडे सागरची आई स्टोअररुममध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडल्याने सगळी बोंबाबोंब सुरु झाली. मिहीरने मुक्ताच्या आईला स्टोअररुमची कडी लावताना पाहिलं असल्यामुळे तो सागरला मुक्ताची आई स्टोअररुमच्या बाहेर होती असं सांगतो आणि यावरून वाद चिघळतो. यातच मुक्ता आणि मिहिका सागर- मिहिरीशी वाद घालू लागतात. हे आपल्या आईने केलं नसल्याचं सांगतात. इथे लकी येऊन वाद थांबवतो आणि सगळे इंद्राला घरी घेऊन जातात. घरी जाताना मुक्ताची आई लकीकडे येऊन तिनेच इंद्राला स्टोअररुममध्ये बंद केल्याचं कबुल करते.

यानंतर आता मालिकेत येणार ट्विस्ट फार मोठा आहे. मालिकेत लवकरच सईच्या कस्टडीची सुनावणी होणार असून याचा प्रोमो ‘स्टार प्रवाह’च्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सईला विचारलं जात की, ‘तू मम्मी आणि पप्पा या दोघांपैकी कोणाबरोबर राहशील.. ? बाळा सांग तुला कोणाबरोबर राहायचं आहे..? यावर सई मम्मी (सावनी) आणि पप्पा (सागर) या दोघांपैकी कुणाचीही निवड न करता म्हणते की, ‘मला मुक्ता आंटीकडे रहायचं आहे’. हे ऐकून सगळ्यांनाचं धक्का बसतो आणि मुक्ता भावुक होते. आता मालिकेचे पुढील भाग पाहण्यात प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.