हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका अत्यंत लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. छोट्या पडद्यावर या मालिकेने प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवली आहे. खरंतर ही मालिका हिंदी मालिकेचा मराठी रिमेक आहे. मात्र तरीसुद्धा मराठीतून या मालिकेने विशेष प्रेम मिळवलं आहे. आता ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. अखेर मल्हारला स्वराज मुलगा नसून मुलगी आहे हे समजणार आहे. तास एक प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सध्या मालिकेत मल्हार आणि वैदेहीची मुलगी स्वरा हि स्वराज होऊन मुलाच्या वेशात कामतांच्या घरी राहत आहे, हे आपण पाहत आहोत. पण आता ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी पिहू स्वराजला राखी बांधत असताना तो मुलगा नाही तर मुलगी असल्याचं सत्य मल्हारसमोर उघड होणार आहे. मालिकेचा हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, मल्हारची बायको मोनिकासुद्धा सगळे पुरावे मल्हारसमोर उघड करते. स्वराचा जन्म दाखला, तिचे लांब केस आणि तिचा मुलगी असल्याचे फोटो पाहताच मल्हार हादरतो.
‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा हा अत्यंत महत्वपूर्ण भाग या सोमवारी ११ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री ९ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणार आहे. आता स्वराज मुलगा नसून मुलगी असल्याचं सत्य सर्वांसमोर आल्यानंतर मल्हार काय निर्णय घेणार..? स्वराचं सत्य मल्हार स्वीकारू शकणार का..? आता स्वराला कामतांच्या घरातून बाहेर काढणार का..? मोनिकाच्या कपटीपणाला खरंच यश मिळणार का..? या सर्व प्रश्नांचे उत्तर या सोमवारी प्रसारित होणाऱ्या भागात मिळणार आहे.