हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विशाखा सुभेदार हे मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय नाव आहे. कॉमिक विश्वात तर विशाखा सुभेदार यांची एक अनोखी ओळख आहे. विनोदाचं परफेक्ट टायमिंग साधत त्यांनी कायम प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून त्यांनी विविध कॉमिक अंदाजातील भूमिका साकारल्या आहेत. विशाखा सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. त्यामुळे वेगवेगळे कॉमिक व्हिडीओ, रिल्स आणि नृत्याची आवड असल्यामुळे डान्सचे व्हिडीओदेखील त्या शेअर करत असतात.
विशाखा सुभेदार यांच्या अशाच एका रील व्हिडीओ पोस्टवर चाहत्याने केलेली कमेंट भारी चर्चेत आली आहे. यामध्ये त्या ‘आपकी आँखो में कुछ….’ या गाण्याचे बोल गुणगुणताना दिसत आहेत. या व्हिडीओवर एका चाहत्याने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चाहत्याने लिहिले आहे कि, ‘मला कॉलेजमध्ये असताना एक मुलगी खूप आवडायची. त्यावेळी ती बारावीत होती आणि मी १४ वीत होतो. तिचे नाव विशाखा होते. मी जेव्हा तुमच्या अशा काही पोस्ट पाहतो, तेव्हा मला माझे जुने दिवस आणि आठवणी आठवतात. या विशाखा नावाच्या मुली डोळ्यांनी खेळतात, ती पण खेळायची!’
यावर अभिनेत्री विशाखा सुभेदार आईनी स्माईली इमोजी शेअर केले आहे. सोबत प्रतिक्रिया देताना लिहिले आहे कि, ‘मी खेळत नसते’. यावर पुन्हा त्या चाहत्याने कमेंट करत म्हटले आहे कि, ‘विशाखा सुभेदार काहीपण, तुझा बरसे ए क्यू अँखीया वाला विडिओ पहा, य बाबा एकदम खतरनाक ! तू typical herione आहे! आणि जाम फेवरेट आहे, तशी नम्रता संभेराव फेवरेट आहे पण तुझं नाव विशाखा आहे म्हणून तू पहिली’. अशाप्रकारे अनेक चाहत्यांनी कमेंट करत विशाखाच्या सादरीकरणाचे कौतुक केले आहे.