हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. मालिका विश्वातून प्रकाशझोतात आलेला हा चेहरा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. त्यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमधुन प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. शिवाय विविध विषयांवर परखड बोलण्याच्या सवयीमुळे ते कायम चर्चेत असतात. आताही त्यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. जी तुफान व्हायरल होत आहे.
किरण माने कायमच सोशल मिडीयावर विविध पोस्ट शेअर करत असतात. अशीच एक पोस्ट त्यांनी नुकतीच शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मानेंनी हिंदू – मुस्लिम संबंधी एक मीम शेअर केला आहे. ज्याची तुफान चर्चा रंगली आहे. किरण माने यांनी शेअर केलेल्या मीममध्ये जोकर दिसतोय आणि त्यावर लिहिलं आहे कि, ‘पुन्हा सांगतो लक्षात घे.. भारतात मुस्लिम आहे म्हणुन तुम्ही हिंदू आहात; नंतर तुम्ही खालच्या किंवा वरच्या जातींचे राहणार आहात’. हा मीम जितेंद्र रायकर यांनी बनवलेला आहे.
या मीमसोबत किरण माने यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘…हे मीम लै खोल हाय. एका फटक्यात भानावर आननारं हाय. बघा. विचार करा’. नेटकऱ्यांनी किरण माने यांच्या पोस्टवर विविध कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिलंय, ‘अगदी बरोबर डायरेक्ट मुळावर घाव’. तसेच आणखी एकाने लिहिलय, ‘हिंदू धर्मात जातीवादाची दुर्गंध आहे’. तर अन्य एकाने लिहिले, ‘हा धर्म, धर्म नसुन मानवतेला लागलेला कलंक आहे’. याशिवाय आणखी एकाने लिहिलं, ‘हिंदु लोकांना शब्दाचा अर्थ कळाला असता तर आज हिंदु हुशार असते’.