श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी..!! आदेश बांदेकरांनी ‘अशी’ साजरी केली गोकुळाष्टमी; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सालाबादप्रमाणे यंदाही जगभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला गेला. कृष्णाचा जन्म दिवस श्रावण महिन्यात वैद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत झाला. म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची हिंदू धर्मीयांमध्ये प्रथा आहे. श्रीकृष्ण जन्म हा पवित्र उत्सव मानला जातो. या दिवशी अनेक घरांत रात्री १२.४० च्या मुहूर्तावर श्रीकृष्णाची बाल मूर्ती पाळण्यात ठेवून त्याचे कोडकौतुक केले जाते. मनोभावे पूजा आराधना केली जाते. अशीच पूजा अभिनेते आदेश बांदेकर यांच्याही घरी संपन्न झाली. ज्याची झलक त्यांनी शेअर केली आहे.

प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनी त्यांच्या घरातील श्रीकृष्ण जन्माष्टमीचा एक खास व्हिडीओ अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी त्यांच्या देवघराची झलक दाखवली आहे. याचसोबत त्यांनी श्रीकृष्णाची मनोभावे पूजा करताना श्रीकृष्णजन्माष्टमीचा सोहळा साजरा केल्याचे दाखवले आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीस एका चांदीच्या पाळण्यात बाळ कृष्णाची मूर्ती दिसते आहे. या पाळण्याला तुळस, चाफा आणि मोगऱ्याच्या फुलांनी सजावट केल्याचे दिसत आहे.

इतकेच नव्हे तर बाळ कृष्णाच्या मुखी दही देखील दिसत आहे. याशिवाय आदेश बांदेकर यांनी संपूर्ण देव्हाऱ्याची झलक दाखवली आहे. ज्यामध्ये बांदेकरांच्या देवघरात गणपतीची चांदीची मूर्ती, आई अंबाबाईचा मुखवटा आणि तिचे सिंहासन, मोठा शुभ्र शंख, चांदीची राम लक्ष्मण सीता यांची मूर्ती, शंकराची पिंडीदेखील दिसत आहे. तसेच श्री स्वामी समर्थांची मोठी फोटोफ्रेम आणि त्यांच्या चांदीच्या पादुकादेखील आहेत. यासह श्री सिद्धीविनायक, श्री दत्तगुरु यांचेही मोठे फोटो देवघरात पहायला मिळत आहेत.