CM शिंदेंची केईम रुग्णालयाला अचानक भेट; अभिनेता व्हिडीओ शेअर करत म्हणाला, ‘इतक्या ग्राऊंड लेव्हलला…’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्याचं राजकारण एका वेगळ्याच लेव्हलवर चालू, अत्यंत घाणेरडी राजनीती, महाराष्ट्राचं भवितव्य काय असणार..? असे बरेच प्रश्न, टीका गेल्या काही महिन्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केल्या गेल्या. पण काल २१ ऑगस्ट २०२३ रोजी सोमवारी रात्री अचानक राज्याचे मुख्यमंत्री केईएम रुग्णालयात येऊन धडकले अन सगळ्यांची तारांबळ उडाली. मुख्यमंत्र्यांच्या या अचानक भेटीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणतीही पुर्वकल्पना न देता मुंबईच्या केईएम हॉस्पीटलला ही भेट दिल्याने आरोग्य अधिकारी ते हॉस्पीटलचे कर्मचारी सगळ्यांच्या पुंग्या टाईट झाल्या होत्या.

इतक्या धडाडीने ग्राउंड लेव्हलवर उतरणाऱ्या मुख्य्यामंत्र्यांचे कौतुक करण्यासाठी अभिनेता अभिजीत केळकरने एक पोस्ट शेअर केली आहे. अभिजित केळकरने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केईएम हॉस्पीटलमध्ये जी भेट दिली त्याचा व्हिडीओ स्टोरीवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत अभिजीत म्हणाला कि, ‘इतक्या ग्राऊंड लेव्हलला काम करणारे पहिलेच मुख्यमंत्री’. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केईम रुग्णालयाला अचानक भेट देत डॉक्टरांची आणि कर्मचाऱ्यांची भेट घेतली.इतकेच नव्हे तर सर्व सोयी सुविधांची पाहणी केली. खरंतर मुख्यमंत्री याठिकाणी एका कार्यक्रमानिमित्त आले होते. पण कार्यक्रमानंतर त्यांनी अचानक केईएम रुग्णालयाकडे मोर्चा वळवला आणि यावेळी सगळेच तंतरले.

हॉस्पिटलमधील सोयीसुविधा, उपकरणे यांची पाहणी करत त्यांनी भरती रुग्णांच्या नातेवाईकांशी देखील संवाद साधला. ठाण्यातील कळवा हॉस्पिटलमध्ये २४ तासांत १८ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर शिंदेंनी १० दिवसात अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. याच संदर्भात केईएम रुग्णालयाला भेट दिल्याचे बोलले जात आहे. जनरल वाॅर्ड ते आयसीयूमधील रुग्णांच्या नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर केईएमच्या आयसीयु विभागाचे अनेक लोकांनी कौतुक करत उपचारांबद्दल समाधान व्यक्त केल्याचे शिंदेंनी सांगितले. यासह बंद ६ वाॅर्डची पाहणी केली आणि यामुळे ४०० ते ४५० रुग्णांचे अ‍ॅडमिशन होत नसून रुग्णांची गैरसोय होत असल्याचे समजत हे काम युद्धपातळीवर करण्याची सूचना दिली. तसेच या कामाची पाहणी करण्यासाठी पुन्हा येईन असेही शिंदेंनी सांगितले.