‘खूप फिल्मी वाटू शकतं…’; ‘BIGG BOSS मराठी 4’ संबंधित अक्षय केळकरची स्पेशल पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता आणि अभिनेता अक्षय केळकर हा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. त्यामुळे वेगवेगळ्या लुकसह वेगवगळ्या पोस्ट शेअर करत तो नेहमीचा चर्चेत येताना दिसतो. अभिनेता, निवेदक आणि चित्रकार अशी अक्षयची ओळख आहे. सोशल मीडियावर तो कायम आपली चित्र आणि कलाकृतीचे दर्शन घडवताना दिसतो. शिवाय बिग बॉससाठी तो कायम वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतो. आताही त्याने ‘बिग बॉस मराठी 4’ संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे.

अक्षयला ‘बिग बॉस मराठी’चा प्लॅटफॉर्म मिळाला आणि श खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. त्यामुळे तो नेहमीच बिग बॉस मराठीच्या आठवणीत रमताना दिसतो. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरून त्याला 1 वर्ष पूर्ण झालं आणि यानिमित्ताने त्याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात अक्षयने ‘बिग बॉस मराठी’च्या घरातला एक व्हिडीओ शेअर केला आहे. सोबत लिहिलंय, ‘माझ्या आयुष्यातील एका मोठ्या दिवसाला आज एक वर्ष झालं…’.

‘आयुष्यातला एक क…मा…ल.. क्षण म्हणजे, बिग बॉसने माझ्या घरातल्या प्रवासाचं, खिलाडू वृत्तीचं केलेलं कौतुक आणि एका सुंदर क्षणांनी भरलेल्या प्रवासातला विजयाचा तो शेवटचा दिवस… त्याला आज एक वर्ष पूर्ण होतंय. (हे खूप फिल्मी वाटू शकतं, पण एक वर्ष झालंय खरंच वाटत नाही. अजूनही घरात असल्यासारखंच वाटतंय.) मायबाप रसिकांचे मनापासून आभार. हा प्रवास तुमच्यामुळे शक्य झाला. क्रूपासून ते सगळ्यांचा मी आभारी आहे. तुम्ही सर्वजण भारी आहात. बिग बॉस आणि मायबाप प्रेक्षक, आय लव्ह यू, मी खरंच फक्त आणि फक्त तुमचाच आहे’.