अभिनेता अंशुमन विचारेने खरेदी केलं नवं घर; व्हिडिओ शेअर करत म्हणाला, ‘खूप खूप…’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कॉमिक सिने विश्वातील लाडका अभिनेता अंशुमन विचारेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या कार्यक्रमांमधून त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अंशुमन सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक असून कायम वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतो. नुकतीच त्याने वैयक्तिक आयुष्यातील एक मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसह शेअर केली आहे.

अभिनेता अंशुमन विचारेने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. प्रत्येक माणसाला वाटत कि आप स्वतःच हक्काचं घर असावं आणि हेच स्वप्न अंशुमन विचारेने पूर्ण केले आहे. अभिनेता अंशुमन विचारेने नुकतंच मुंबईत नवीन घर खरेदी केलं आहे. सध्या त्याच्या नवीन घराच्या बिल्डिंगचे बांधकाम सुरु आहे. अलीकडेच त्याने नव्या घराच्या कन्स्ट्रक्शन साइटला आपल्या पत्नीसह भेट दिली होती आणि यावेळी त्याने तयार केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘नवं घर लवकरच… खूप खूप वाट पाहात आहोत’. अंशुमनने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच अनेक कलाकार मंडळींनी देखील कमेंट करत अंशुमनला खूप खूप शुभेच्छा देत त्याचे कौतुक केले आहे. गेल्या वर्षभरात अनेक मराठी कलाकारांनी नवं घर खरेदी केल्याचं समोर आलं आहे. यामध्ये प्रसाद खांडेकर, पृथ्वीक प्रताप, अक्षय केळकर, स्मिता शेवाळे, मयुरी वाघ, धनश्री काडगावकर या कलाकारांचा समावेश आहे.