अभिनेता श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक; तातडीने करावी लागली अँजिओप्लास्टी


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वाचा लाडका अभिनेता श्रेयस तळपदेच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. गुरुवारी श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. या बातमीने चाहत्यांच्या हृदयांचा ठोका चुकला असून आता श्रेयसच्या तब्येतीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. यानुसार, श्रेयस तळपदेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून असे समजले आहे कि, आता अभिनेत्याची प्रकृती ठीक आहे.

अभिनेता श्रेयस तळपदे मुंबईत ‘वेलकम टू जंगल’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. गुरुवारी याच सिनेमाचे शूटिंग संपवून घरी परतल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. यानंतर लगेच त्याच्या पत्नीने त्याला अंधेरीतील बेलव्ह्यू रुग्णालयात दाखल केले आणि डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर श्रेयसच्या छातीत ब्लॉक असल्याचे आढळून आले. आवश्यकतेप्रमाणे, डॉक्टरांनी त्याची अँजिओप्लास्टी केली. महत्त्वाचे असे कि, डॉक्टरांनी ही अँजिओप्लास्टी त्याला हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच केली आहे.

अँजिओप्लास्टी केल्यानंतर श्रेयस सध्या रुग्णालयातच उपचार घेत आहे आणि येत्या २ दिवसांमध्ये त्याला डॉक्टरांकडून डिस्चार्ज देण्यात येईल असे सांगितले जात आहे. दरम्यान, अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी गुरुवारी वाऱ्यासारखी पसरली आणि चाहते चिंतेत पडले. श्रेयसची तब्येत कशी आहे..? तो ठीक आहे का ..? अशा प्रश्नांनी जोर धरला. त्यानंतर आता डॉक्टरांनी त्याच्या प्रकृतीविषयी माहिती दिल्यानंतर चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. आता श्रेयसने पूर्णपणे आराम करावा आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी असा सल्ला त्याचे चाहते आणि मित्र मंडळी देत आहेत.