आय- बापाची लाराची लेक…!! हेमांगी कवी झाली कोळीण; नवा लूक व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमांगी कवी हि मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. विविध मालिका, चित्रपट आणि सीरिजच्या माध्यमातून हेमांगी कवीने कायम प्रेक्षकांसमोर वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक भूमिकेतून हेमांगीने एक वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे. हेमांगी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे विविध लूकमधील फोटो, तसेच वेगवेगळ्या विषयांवरील बेधडक आणि बिंधास्त अशा पोस्ट ती शेअर करताना दिसते. सध्या सोशल मीडियावर तिचा कोळी लूक व्हायरल होतो आहे.

अभिनेत्री हेमांगी कवीने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर तिच्या नव्या लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. हेमांगीने यावेळी कोळीणीचा लूक परिधान केला आहे. फोटोत तिने गुलाबी रंगाची फ्लोरल साडी आणि त्यावर डार्क निळ्या रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे. साजेसे दागिने, केसाचा बन आणि डोळ्यात काजळ असा हेमांगीचा भारी लूक कमालीचा व्हायरल होत आहे. या फोटोसोबत ‘कोळीण’ आणि ‘आय- बापाची लाराची लेक मी लारी!’ असे कॅप्शन तिने शेअर केले आहेत.

या फोटोंसोबत हेमांगीने ऑडिशन लूक असा हॅशटॅग शेअर केला आहे. त्याप्रमाणे हेमांगीचा हा कोळी लूक कोणत्यातरी प्रोजेक्टसाठी दिलेली ऑडिशन आहे. हेमांगीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट करत तिच्या लूकचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले आहे कि, ‘म्हसवडची कोळीण’. तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे कि, ‘वा काय भारी दिसत आहेस तू.. अस्सल कोळीण सारखी त्यात तुझ सावळ रूप मनमोहक दिसत आहे.. नजर तर काळजा वर तीर सोडत आहेत’.