सनई- चौघडे वाजणार!! जुई गडकरी ‘या’ तारखेला विवाह बंधनात अडकणार; स्वतःच दिली माहिती


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून मोठ्या ब्रेकनंतर अभिनेत्री जुई गडकरी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे खळखळून मोरंजन करताना दिसत आहे. जुईची हि मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली असून आता या मालिकेचा टीआरपी देखील शिखरावर आहे. या मालिकेमुळे मध्यंतरी गायब झालेल्या जुईला एक चांगला कमबॅक मिळाला. इतकेच नव्हे तर आता ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या नजरेत आली आहे. यामुळे सर्व स्तरांवर तिचा चाहता वर्ग वाढू लागला आहे. दरम्यान जुईने नुकतेच तिच्या खऱ्या आयुष्यात लग्न कधी करणार याचा खुलासा करत चाहत्यांना धक्का दिलाय.

‘ठरलं तर मग’ या मालिकेत सायली हे पात्र साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी खऱ्या आयुष्यात लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चांना आता उधाण आलं आहे. मालिकेतील अर्जुन – सायलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली आहे. यानिमित्त अर्जुन- सायली म्हणजेच अभिनेता अमित भानुशाली आणि अभिनेत्री जुई गडकरी यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली आहे. यावेळी संवाद साधताना जुईने थेट तिच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार आता जुई गडकरी पुढच्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे.

मुख्य म्हणजे यावेळी जुईने फक्त वर्षच नव्हे तर तारखेचाही उल्लेख केला आहे. जुईने म्हटल्याप्रमाणे ती ४ फेब्रुवारी २०२४ रोजी लग्न करणार आहे. जुईने थेट लग्नाची तारीख सांगितल्यामुळे आता चाहत्यांमध्ये तिचा लाईफ पार्टनर नक्की कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. जुईने स्वतःच थेट स्वतःच्या लग्नाची तारीख जाहीर केल्याने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. पण यावेळी जुईने ती नक्की कोणाशी लग्न करणार आहे..? तिचा होणारा नवरा कोण आहे..? तो काय करतो..? याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. पण लग्नानंतर जुईला तिच्या नवऱ्याला आणि संसाराला वेळ द्यायचा आहे, असे तिने आवर्जून सांगितले. त्यामुळे जुईचा ‘तो’ नक्की कोण आहे..? हे जाणून घेण्याची उत्सुकता ताणली गेली आहे.