झी मराठीच्या ‘या’ मालिकेत मीरा जोशीची एंट्री; शरद पोंक्षेंबरोबर करणार काम


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मीरा जोशी ही सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनय आणि नृत्य शैलीच्या जोरावर नाव कमावणारी मीरा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. अलीकडेच तिने बॉयफ्रेंडसोबतचे काही फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली. ज्यामुळे तिच्या लग्नाची चर्चा रंगली. पण हे सगळं प्रमोशनचा भाग असल्याचे समोर आले. ज्यामुळे प्रेक्षकांची नाराजी झाली. यानंतर आता मीराच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती अशी कि लवकरच मीरा झी मराठीच्या एका मालिकेतून नव्या भूमिकेत दिसणार आहे.

मालिका, चित्रपट आणि रिअ‍ॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली मीरा आता ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘दार उघड बये’मध्ये नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मीरा जोशीने याबाबत अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना माहिती दिली आहे. या व्हिडीओत मीरा जोशी ‘चंद्रा’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तसेच तिच्याबरोबर या रिलमध्ये अभिनेते शरद पोंक्षेदेखील पहायला मिळत आहेत. यावरून हे स्पष्ट आहे कि, मीरा ‘झी मराठी’वरील ‘दार उघड बये’ या मालिकेचा एक भाग झाली आहे.

या व्हिडिओसोबत अभिनेत्री मीरा जोशीने लिहिले आहे कि, ‘मी ‘’चंपा’’ येतेय तुमचं मनोरंजन करायला उद्यापासून रोज रात्री ८.३० वाजता मालिका ‘‘दार उघड बये’’मध्ये… अर्थात आपल्या लाडक्या ‘‘झी मराठी’’ वाहिनीवर’. मीराची ही पोस्ट पाहून तिचे चाहते खुश झाले आहेत. या पोस्टवर कमेंट करत तिचे चाहते तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.