‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्रीची बॉयफ्रेंडसाठी रोमँटिक पोस्ट; क्युट व्हिडिओतुन शेअर केले स्पेशल मुमेंट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाहवर काही महिन्यांपूर्वी सुरू झालेली ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत अव्वल क्रमांकावर आहे. या मालिकेने अगदी अल्पवधीतच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्यामुळे या मालिकेच्या कथानकासोबत या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचले आहे. मुक्ता, सागर, सई, सावनी यांच्या व्यक्तिरिक्त मालिकेतील इतर पात्रांनीदेखील प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. यातील एका अभिनेत्रीने नुकतीच सोशल मीडियावर तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. जी व्हायरल होत आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत मिहिका हे पात्र साकारणारी अभिनेत्री मृणाली शिर्के सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. त्यामुळे फोटो, व्हिडीओ यांसह वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी ती या माध्यमातून शेअर करताना दिसते. अलीकडेच काही दिवसांपूर्वी तिने तिच्या बॉयफ्रेंडच्या वाढदिवसानिमित्ताने एक खास पोस्ट केली होती. ज्यामध्ये तिने एक स्पेशल व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडिओत पोस्टमध्ये मृणाली आणि तिचा बॉयफ्रेंड रोहन दोघेही क्युट मुमेंट एन्जॉय करताना दिसत आहेत.

या व्हिडिओसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘माझ्या आनंदाचे व माझ्या शांत स्वभावाचे एका शब्दा वर्णन करायचे असल्यास, तर हे कार्टून आहे. माझ्या प्रेमा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्या वागण्याने तू नेहमी मला आनंदी ठेवतोस आणि याचा मला अभिमान वाटतो. तू माझा खरंच खूप चांगला मित्र आहेस, रोहन. तुझा वाढदिवस असेल पण तू माझ्यासाठी एक खास भेट आहेस. यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते’. तिच्या या पोस्टवर रोहनने कमेंट करत म्हटलं, ‘धन्यवाद माझ्या प्रेमा. हे खूपच गोड आहे (लाजिरवाणे). मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. सगळ्या गोष्टीसाठी खूप धन्यवाद’. या कमेंटवर मृणाली म्हणाली, ‘वाह…लाजिरवाणे…ठीक आहे बेटा…हा तुझा दिवस आहे…मी आज काहीच बोलणार नाही’.