‘जीवनाच्या या नव्या मालिकेत..’; प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केला आई होण्याचा आनंद


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री राधा सागर सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. गेल्या काही दिवसांपासून राधा तिच्या प्रेग्नेंसीमुळे आणि नव्या घरामुळे चर्चेत राहिली आहे. नुकतीच तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. राधा सागरच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. राधाने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला असून सोशल मीडियावर आनंद शेअर केला आहे.

अभिनेत्री राधा सागरने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत राधाचा, तिच्या नवऱ्याचा आणि तिच्या बाळाचा छोटुसा हात दिसत आहे. या फोटोसोबत कॅप्शन देताना राधा सागरने लिहिले आहे कि, ‘… आणि हा आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण… आम्हाला मुलगा झाला. तो खरोखरच चमत्कारिक आहे… जीवनाच्या या नव्या मालिकेत आम्हाला आई आणि बाबा म्हणून कास्ट केल्याबद्दल धन्यवाद. आम्ही खरोखरच धन्य झालो’.

राधा सागरने हि पोस्ट शेअर करताच तिच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडू लागला आहे. राधाच्या या पोस्टवर चाहते, नेटकरी आणि काही कलाकार मंडळींनी आवर्जून प्रतिक्रिया देत बाळाचे नव्या जगात स्वागत केले आहे. तर राधा आणि तिच्या पतीचे पालक झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. दरम्यान राधा सागर लग्नानंतर तब्बल १० वर्षांनी आई झाली आहे. या काळात तिने करिअरपासून ब्रेक घेतला होता. मात्र आता प्रसूतीनंतर ती तिच्या बाळाच्या संगोपनावर भर देणार असल्याचे तिने अलीकडेच एका मुलाखतीत म्हटले आहे.