‘जाडी झालीयेस.. नाचू नको भूकंप येईल..’; अभिनेत्रीच्या वाढत्या वजनामुळे नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील सदस्य आजही चर्चेत असतात. यांपैकी एक म्हणजे सई लोकूर. अलीकडेच सई लोकूर आणि तिच्या पतीने नवीन घर खरेदी केलं. त्यानंतर आता सई फुकेतमध्ये मस्त व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. या व्हॅकेशनचे फोटो आणि व्हिडीओ सई आवर्जून सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. दरम्यान तिने स्वतःचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये तिने तमन्ना भाटियाच्या ‘कावाला’ या गाण्याच्या हुक्स्टेप्स केल्या आहेत. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झालाय. पण त्याहून जास्त या व्हिडीओमुळे अभिनेत्री ट्रोल होताना दिसली आहे.

सई लोकूर ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे फुकेतच्या सुट्ट्यांचे फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करते आहे. सईने ‘जेलर’ चित्रपटातील ‘कावाला’ या गाण्यावर डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने गाण्यातील तमन्ना भाटियाने केलेल्या हुकस्टेप फॉलो करताना दिसतेय. पण या व्हिडीओत सईला डान्स करताना पाहून तिला ट्रोल करण्यात आलं आहे. सईचे सुजलेले पाय पाहून तिला अनेकांनी ‘वाढलेले वजन कमी कर’ असे सल्ले दिले आहेत. शिवाय अनेकांनी तिच्या वाढलेल्या वजनामुळे तिची खिल्ली उडवली आहे.

सईच्या या डान्स व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे कि, ‘तू जाडी झालीयेस’. तर आणखी एकाने म्हटले, ‘लै वजन वाढलय’. आणखी एकाने म्हटले कि, ‘फिटनेस नावाची काही गोष्ट असते की नाही’. तर अन्य एकाने म्हटले, ‘या भूकंप या.. भूकंप या या या या …’. या कमेंट्स पाहून सईच्या चाहत्यांनी ट्रोलर्सला फटकारले आहे. एकाने लिहिले, ‘वजन वाढलं वजन वाढलं म्हणणाऱ्यांनो, तुमच्या घरचं खाते की का ती कुत्र्यांनो..? प्रत्येकाचे काहीतरी हेल्थ इश्यूसुद्धा असतात. स्वतःकडे बघा आधी भिकाऱ्यांनो’.