‘उशीर झाला असला तरी..’; समीरा गुजरने शेअर केल्या ‘त्या’ खास कार्यक्रमाच्या आठवणी


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समीरा गुजरचा मोठा चाहता वर्ग आहे. ती एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम सूत्रसंचालिकादेखील आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमात ती सूत्रसंचालनाची जबाबदारी समर्थपणे पेलताना दिसते. समीरा सोशल मीडियावर फार सक्रिय असते आणि आता तिने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे.

अभिनेत्री समीरा गुजरने नुकतीच तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ‘स्वरमैत्र’ या कार्यक्रमाचे काही फोटो शेअर केले आहेत. यासोबत तिने या कार्यक्रमाच्या खास आठवणी सांगताना लिहिलंय की, ‘ही पोस्ट लिहायला उशीर झाला असला तरी स्वरमैत्रची ही दिवाळी पहाट मनात अजूनही लखलखते आहे…. धन्यवाद @ mukeshpatilventures…. इतक्या सुंदर कार्यक्रमात मला सहभागी करून माझी दिवाळी अधिक तेजोमय केल्याबद्दल…..’.

‘जुळून आलेले स्वरमैत्र ही तल्लीनता मंत्रमुग्ध रसिक, विशेष उपस्थिती – अश्विनी भावे, भारती आचरेकर, दीपा जोशी, सुनयना आणि कुशल बद्रिके. विंगेतले काही धमाल क्षण पुढच्या पोस्टमध्ये शेअर करते…..’. समीरा गुजरची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये अनेक कलाकार मंडळी दिसत आहेत. समीरा गुजरने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या ती ‘प्रेमास रंग यावे’ या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसते आहे.