प्रसिद्ध अभिनेत्रीने बनवले कणकेचे दिवे; Video शेअर करत म्हणाली, ‘अंधकारावर प्रकाशाचा विजय म्हणून..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवाळीचा सण म्हटलं की दिव्यांची आरास, कंदील, लाईट्सचे तोरण आलेच. दिवाळीत सर्वत्र लख्ख रोषणाई केली जाते. म्हणूनच तर दिवाळीला दिव्यांचा सण असेही म्हणतात. सर्वसामन्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच दिवाळीचा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात. अभिनेत्री सारिका नवाथे यांनी दिवाळीनिमित्त स्वतःच्या हाताने कणकेचे दिवे तयार केले आहेत. ज्याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

अभिनेत्री सारिका नवाथे यांनी हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘Reels पाहत असताना हे cute गुलाबा सारखे कणकेचे दिवे कसे करायचे ते पहिले .. म्हंटलं चला आपण पण try करू .. केले आणि छान वाटलं .. माझ्या या छोट्याशा आनांदात तुम्ही पण सहभागी व्हा .. कणकेचा दिवा इतर दिव्यांच्या तुलनेत अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानला जातो.अंधकारावर प्रकाशाचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो. अंधार हा कितीही गडद असला तरी प्रकाशाची एक किरण त्याला भेदू शकते, अंधाराचा नाश करू शकते. तुम्ही काय special करताय या वर्षी..? रांगोळी..? फराळ..? Decoration..? जे काही नवीन शिकला असाल , करत असाल नक्की share करा …’

सारिका यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकरी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. केवळ नेटकरी नव्हे तर अनेक सेलिब्रिटी मंडळी देखील सारिका यांच्या पोस्टवर कमेंट करताना दिसत आहेत. अभिनेते अविनाश नारकर यांनी कमेंट करत म्हटलं आहे कि, ‘व्वा व्वा व्वा व्वा व्वा… सारिका…. क्या बात है…!!’ यावर सारिका यांनी रिप्लाय करताना म्हटलं, ‘हो.. आपण सतत दिवे लावत रहायचे..’. अभिनेत्री सोनालीका जोशी, राधिका विद्यासागर यांनीदेखील कमेंट केल्या आहेत.