Adesh Bandekar | ‘माझ्या मनाची साईज…’ वाढदिवशी आदेश बांदेकरांच्या मुलाने दिल्या भावनिक शब्दात शुभेच्छा


Adesh Bandekar | आदेश बांदेकर यांची ओळखी महाराष्ट्राचे लाडके भाऊजी अशीच आहे. अभिनयाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टी मध्ये त्यांनी त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. होम मिनिस्टर या कार्यक्रमातून ते घरोघरी पोहोचले l. अशातच आदेश बांदेकर यांनी त्यांचा 58 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्यांच्या वाढदिवशी त्यांचा मुलगा सोहम बांदेकर यांनी वडिलांसाठी अत्यंत भावनिक पोस्ट केली आहे.

सोहमने इंस्टाग्रामवर त्याच्या वडिलांसोबत एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो शेअर करून त्यांनी लिहिले आहे की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा. आपली जशी शूजची साईज सेम आहे तसेच मला माझ्या मनाचीही साईज तुझ्या मना एवढी मोठी करण्याची इच्छा आहे. आणि जर त्यात थोडीही वाढ झाली तरी माझा 2024 सत्कारणी लागला असे वाटेल.”

हेही वाचा – महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? पुरस्कार सोहळ्यात ‘वेड’ चित्रपटाला मिळाले ‘एवढे’ पुरस्कार, अभिनेत्याने मानले आभार

सोहमने त्याच्या वडिलांसाठी केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. अनेकजण त्याच्या या पोस्टवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर यांच्याप्रमाणे त्यांचा मुलगा सोहम देखील अभिनय क्षेत्रात आहे. नवे लक्ष मालिकेतून त्याने कलाविश्वाt पदार्पण केले. त्याचप्रमाणे सध्या तो ठरलं तर मग या मालिकेची निर्मिती करत आहे. त्याचप्रमाणे बाई पण भारी देवा या सिनेमात त्याचा कॅमेरा देखील दिसला होता.