‘बाप्पा वर्षभर आमच्या सोबत असतात…’; आदेश बांदेकरांनी शेअर केला विसर्जनाचा व्हिडीओ


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गणपती बाप्पाला निरोप देताना जो तो भावुक होतो. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणि तोंडात ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ ओळी असतात. अनेक सर्वसामान्य, बॉलिवूड कलाकार आणि मराठी कलाकारांच्या घरी बाप्पा विराजमान होतात. नुकतंच आदेश बांदेकर यांनी सोशल मीडियावर विसर्जनाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ते गणपती विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीविषयी सांगताना दिसत आहेत.

आदेश बांदेकरांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर त्यांच्या घरगुती गणपतीच्या विसर्जनाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमागे आदेश बांदेकरांचा आवाज ऐकू येतो. ज्यामध्ये ते स्वत: माहिती सांगत आहेत. बांदेकर कुटुंबात गेली १०० वर्ष बाप्पा आले आहेत. ७ दिवस बांदेकरांकडे बाप्पा विराजमान होतात. यंदाही बाप्पाचे आगमन झाले आणि विसर्जनाचा व्हिडीओ आदेश बांदेकर यांनी शेअर केला. यामध्ये आपण पाहू शकतो कि, बांदेकर कुटुंबीय आणि इतर नातेवाईक मिळून बाप्पाची मनोभावे सेवा, आरती करत आहेत. यानंतर सर्व बांदेकरांनी गुलाब पाणी आणि स्वच्छ पाणी घरातील एका टाकीत एकत्र केले.

अशाप्रकारे तांत्रिक पद्धतीचा अवलंब करत पाणी बॉक्स स्वरुपातील टाकीत बाप्पाचे विसर्जन केले. दरवर्षी बांदेकरांच्या बाप्पाचे विसर्जन असेच केले जाते. यानंतर टाकीतील पाणी त्यांच्याच शेतात झाडांसाठी सोडलं जातं आणि माती ही शेतातील मातीत मिसळण्यात येते. या पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केल्यामुळे ‘आमचे बाप्पा वर्षभर आमच्यासोबत असतात’, असे आदेश बांदेकरांनी सांगितले. या व्हिडीओला ‘बांदेकर कुटुंबाच्या ‘गणपती बाप्पांचे विसर्जन…. बाप्पा तू पुढच्या वर्षी लवकर ये ना’ असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.