Adesh Bandekar Wife -‘नसतेस घरी तू जेव्हा…’; पत्नीच्या वाढदिवसानिमित्त आदेश बांदेकरांची खास व्हिडीओ पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Adesh Bandekar Wife) लोकप्रिय मराठी कार्यक्रम होम मिनिस्टरच्या माध्यामातून उभ्या महाराष्ट्रात भावोजी अशी ओळख निर्माण झालेले आदेश बांदेकर गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. तर त्यांची पत्नी सुचित्रा बांदेकर हि मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. फक्त मराठीच नव्हे तर तर तिने हिंदी चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्येही काम केले आहे. आज सुचित्रा बांदेकर यांचा वाढदिवस आहे आणि यानिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. यानिमित्त आदेश बांदेकर यांनीही एक खास व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे.

सुचित्रा बांदेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्यांचे चाहते, शुभचिंतक आणि मराठी तसेच हिंदी सिनेविश्वातील कलाकार मंडळी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. दरम्यान पत्नीच्या (Adesh Bandekar Wife) वाढदिवसानिमित्त आदेश बांदेकर यांनीदेखील अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामच्या माध्यमातून एक खास पोस्ट शेअर केली आहे. हि एक व्हिडीओ पोस्ट आहे. यामध्ये त्यांनी सुचित्रा यांचे काही फोटो आणि त्यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. सोबतच व्हिडिओत त्यांनी घराचे फोटोदेखील शेअर केले आहेत.

Adesh Bandekar Wife

या व्हिडिओत घराचे फोटो शेअर करत बॅकग्राऊंडला ‘नसतेस घरी तू जेव्हा…’ हे गाणे लावले आहे. त्यामुळे अत्यंत भावनिक पद्धतीने आदेश यांनी पत्नी सुचित्राचे आपल्या आयुष्यात काय स्थान आहे हे सांगितले आहे. सोबत ‘सुचित्रा वाढदिवसाच्या शुभेच्छा!!’ असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. आदेश आणि सुचित्रा (Adesh Bandekar Wife) ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी आहे. ‘रथचक्र’ या मालिकेच्या निमित्ताने त्यांची भेट झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. सुचित्रा यांच्या घरून त्यांच्या नात्याला विरोध होता म्हणून त्यांनी पळून जाऊन लग्न केलं. त्यांच्या लग्नाला ३२ वर्ष पूर्ण झाली असून आज दोघांचाही संसार अत्यंत सुखी आहे.