‘हे माझ्यासाठी चॅनल नाही..’; अद्वैत दादरकरचा ‘झी मराठी’च्या महत्वपूर्ण पदाला रामराम


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक अद्वैत दादरकर हा अनेक कलाकृतींमुळे लोकप्रिय ठरला आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ तसेच ‘अग्गंबाई सूनबाई’ या मालिकेत तो अलीकडेच दिसला होता. अद्वैतने २०२२ साली ‘झी मराठी’ वाहिनीसाठी फिक्शन हेडची जबाबदारी स्वीकारली होती. साधारण दीड वर्ष त्याने ‘झी मराठी’ वाहिनीसोबत काम केल्यानंतर अधिकृतरित्या फिक्शन हेडच्या जबाबदारीतून आपले खांदे मोकळे केले आहेत. यासंदर्भात त्याने स्वतःच पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे.

या पोस्टमध्ये अद्वैत दादरकरने लिहिले आहे कि. ‘झी मराठी… हे माझ्यासाठी चॅनल नाही.. Emotion आहे आणि यापुढेही असेल. स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मी कधी Corporate Job करेन.. पण ९ मार्च २०२२ ते १९ सप्टेंबर २०२३… साधारण दीड वर्ष केला बाबा.. Zee Marathi – Fiction Head.. एवढी मोठी जबाबदारी.. त्यासाठी सर्वात आधी माझ्यावर एवढा विश्वास दाखवला म्हणून PM Sir, अमीत सर, निलेश मयेकर, कल्याणी सगळ्यांचे मनापासून आभार… ह्या संपूर्ण दीड वर्षात प्रचंड काम केलं.. कधी थकलो.. कधी समाधान मिळालं.. कधी यश मिळालं.. जास्त अपयशच मिळालं.. धडपडलो.. भांडलो.. वाद घातला.. कधी कठोर निर्णय घ्यावे लागले.. ह्या सगळ्यात एक माणूस म्हणून घडलो.. हे सगळे अनुभव.. नवीन जग.. गोष्ट सांगण्याची प्रत्येक वेळेला नवीन पद्धत शोधणं.. गोष्टीच्या.. पात्रांच्या.. त्यांच्या भावनांच्या खोलात शिरून.. प्रेक्षकांना खरेपणाचा.. अस्सल अनुभव देण्यासाठी झी मराठी नेहमीच झगडते तसे आम्ही सुद्धा झगडलो.. ही सगळी माणसं माझ्या नुसती आयुष्यात आली नाहीत..तर आयुष्याचा भाग बनली..आणि शेवटी आठवणी माणसच तयार करतात..’

पुढे लिहिलंय, ‘ह्या दीड वर्षातल्या काही आठवणी.. पण झी मधल्या प्रत्येक डिपार्टमेंट मधल्या प्रत्येकाला thank you so much.. आणि fiction team तुम्हाला विशेष thanks.. तुम्ही सुद्धा तुमचा बॉस म्हणून मला अगदी सहज स्वीकारलत.. खूप miss करेन सगळ्यांना.. आत्ता प्रत्येक whatsapp group मधून बाहेर पडताना सुद्धा हात जड झाले काही सेकंद.. डोळ्यात पाणी आलच.. पण आपण टीम म्हणून एकत्र केलेलं काम.. मजा मस्करी.. किस्से.. सगळं खूप miss करेन.. कधी कोणाला दुखावलं असेन तर Sorry आणि ह्या संपूर्ण गोड अनुभवासाठी सगळ्यांचे मनापासून आभार.. मला खात्री आहे.. लवकरच झी मराठीचे जुने दिवस.. तो अभिमान.. सगळं परत येईल.. All the best आणि मी मराठी.. झी.मराठी..’. अद्वैत दादरकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या तो प्रिया बापट आणि उमेश कामत यांचे नवे नाटक ‘जर तरची गोष्ट’साठी दिग्दर्शकाची जबाबदारी पार पाडत आहे.