‘खतरों के खिलाडी 13’मध्ये शिव ठाकरे बाजी मारणार..?; शोबाबत मोठी अपडेट समोर


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रोडीज, मराठी बिग बॉस सीजन २ आणि त्यानंतर हिंदी बिग बॉस सीजन १६ गाजवून अमरावतीचा मराठमोळा शिव ठाकरे आता रोहित शेट्टीचा ‘खतरों के खिलाडी सीजन १३’ हा शो गाजवतो आहे. मराठी बिग बॉस सीजन २ चे विजेते पद मिळवून शिवने हिंदी बिग बॉस सीजन १६’मधेही फुल्ल राडा केला. या शोचे उपविजेतेपद पटकावल्यानंतर त्याची आणखीच हवा झाली. बिग बॉस सीजन १६ चा विजेता एमसी स्टॅन झाला पण चर्चा तर शिव ठाकरेची झाली. यानंतर आता शिव रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी सीजन १३’ गाजवताना दिसतोय.

बिग बॉस सीजन १६ च्या दरम्यान शिव ठाकरेला ‘खतरों के खिलाडी’ या रिऍलिटी शोच्या १३ व्या सिझनची ऑफर मिळाली होती. यानंतर शिवने ‘खतरों के खिलाडीच्या सीजन १३ मध्ये धडाकेबाज एंट्री घेतली आणि सगळ्यांना थक्क करून टाकले. आतापर्यंत खतरों के खिलाडीच्या या पर्वात एंट्री केलेले सर्व स्पर्धकांनी जीवाची बाजी लावून स्टंट केले आहेत. अनेकांना दुखापतीमुळे हा शो अर्ध्यातच सोडावा देखील लागला. या शोमध्ये होणाऱ्या स्टंटमध्ये आपले १००% प्रयत्न करून ८ स्पर्धक फायनलमध्ये पोहोचले. ज्यामध्ये शिव ठाकरेचाही समावेश आहे.

शिवने आपल्या दमदार खेळाडू वृत्तीच्या जोरावर ‘खतरों के खिलाडी सीजन १३’ च्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. जीवघेण्या स्टंटमधील थक्क करणारी कामगिरी शिव ठाकरेला खतरों के खिलाडीच्या १३ व्या पर्वत अंतिम फेरीपर्यंत घेऊन गेली आहे.

यामुळे शिव ठाकरेचे चाहते प्रचंड खुश आलेत. सध्या शिव ठाके हा खतरों के खिलाडीच्या या पर्वातील अत्यंत दमदार खेळाडू मानला जात आहे. ज्यामध्ये फिनालेमध्ये तो सर्वाना मात देऊन विजेतेपद मिळवेल अशी आशा आहे. सध्या या शोचे ६०% पेक्षा जास्त शूटिंग पूर्ण झाले आहे आणि या जुलैमध्ये कलर्स टीव्हीवर या शोचा प्रीमियर होणार आहे.