हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. हिंदी मालिकेचा रिमेक असूनही प्रेक्षकांनी या मालिकेला विशेष प्रेम दिले आहे. सध्या हि मालिका अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. सईवरील प्रेमाखातर मुक्ता आणि सागर एकमेकांसोबत लग्न करण्यास तयार झाले आहेत. त्यामुळे आता मालिकेत मुक्ता आणि सागरच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे.
साखरपुड्यानंतर आता मेहंदी, हळद, सप्तपदी असे लग्नाआधीचे सर्व विधी आणि त्यांनतर लग्न असे या मालिकेचे विशेष भाग पहायला मिळणार आहेत. दरम्यान, लग्नानंतर सागरची लेक सई मुक्ताला काय नावाने हाक मारणार..? हा प्रश्न अनुत्तरित आहे. पण आता याचा खुलासा स्वतः सईने म्हणजेच बालकलाकार इरा परवडेने केला आहे. एका नामवंत वाहिनीसोबतच्या मुलाखतीत बालकलाकार इरा परवडेने हि माहिती दिली आहे. यावेळी तिने लग्नात काय धमाल करणार..? आणि तिच्या मुक्ता आंटीला लग्नानंतर कोणत्या नावाने हाक मारणार..? याविषयी सांगितलं.
या मुलाखतीदरम्यान इरा म्हणाली कि, ‘सागर पप्पा आणि मुक्ता आंटीचं लग्न झाल्यानंतर मी मुक्ता आंटीला ”मुक्ता आई” अशी हाक मारणार’. मुक्ता आणि सागर दोघेही हे लग्न केवळ सईसाठी करत आहेत. पण लग्नानंतर त्यांच्या नात्यातलं अंतर मिटेल का..? सागर आणि मुक्त यांच्या जवळीक येईल का..? सागर- मुक्ताच्या लग्नानंतर सावनीची काय प्रतिक्रिया असेल..? सागर- मुक्ता आणि सईच्या त्रिकोणी कुटुंबाला सावनीची दृष्ट लागणार का..? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मालिकेच्या येत्या भागांमध्ये समजतील. तूर्तास मालिकेतील लग्न विशेष भागांमध्ये कोळी आणि गोखले कुटुंबातील खिटपिट आणि लगीनघाई पहायला मिळते आहे.