बाबांच्या निधनाने कोलमडली अभिनेत्री; प्रा. हरी नरकेंच्या मुलीचं सांत्वन करताना हेमांगी म्हणाली..


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री हेमांगी कवी हि नेहमीच विविध विषयांवर बोलताना दिसते. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी हेमांगी अनेकदा याच माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होत असते. आज सोशल मीडियावरून तिने समता परिषदेचे उपाध्यक्ष आणि लेखक विचारवंत प्रा. हरी नरके यांना अत्यंत जड अंतःकरणाने आदरांजली वाहिली आहे. मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. प्रा. हरी नरके याची लेक प्रमिती देखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. कला विश्वातील अनेक मंडळींनी तिचे सांत्वन केले आहे. ज्यामध्ये हेमांगीचा देखील समावेश आहे.

हेमांगीने या सोशल मीडिया फेसबुकवर प्रा. हरी नरके यांचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘हरी नरके सारख्या व्यक्तींच्या जाण्याने फक्त त्यांच्या घरातल्यांचं नाही तर अख्ख्या समाजाचं नुकसान होतं! Sir, तुम्हांला भेटायचं राहून गेलं. पण तुमचे विचार, तुमचा अभ्यास, तुमची पुस्तकं कायम मार्गदर्शक ठरतील!प्रमिती तुझ्यासाठी हा किती मोठा धक्का असू शकतो याची मला कल्पना सुद्धा करवत नाहीय. Take care dear! बाबांच्या विचारांची, कार्याची ज्योत तेवत ठेवायचीए!’

अभिनेत्री प्रमिती ही हरी नरके यांची एकुलती एक लेक आहे. आतापर्यंत तिने मराठी कलाविश्वात विविध माध्यमात काम केले आहे. तिने ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत साकारलेले ‘हेमा’ हे पात्र अलीकडच्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले तिचे काम आहे. याशिवाय तिने ‘तु माझा सांगाती’ या मालिकेत अवलीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले होते. दरम्यान वडिलांच्या निधनानंतर प्रमिती प्रचंड धक्क्यात आहे. यातून सावरण्यासाठी तिचे कुटुंबीय आणि मित्र मंडळी तिला मदत करत आहेत.