हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार मंडळी एकापाठोपाठ लग्न बंधनात अडकताना दिसली. काही दिवसांपूर्वीच अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ जुने होण्याआधीच आणखी एका सेलिब्रिटी जोडप्याने लग्न केल्याचे समोर आले. अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे यांनी ६ डिसेंबर २०२३ रोजी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधत चाहत्यांना सुखद धक्का दिला. पियुषचं हे तिसरं लग्न असल्यामुळे बरीच चर्चा सुरु झाली आणि या दरम्यान एका मुलाखतीत लग्नानंतरची त्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
अभिनेता पियुष रानडेने मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सुरुची अडारकरसोबत ६ डिसेंबर रोजी गुपचूप तिसरं लग्न केलं. फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी लग्न केल्याचे समोर आले. माहितीनुसार, पियुष आणि सुरुची एकमेकांना गेल्या ३ वर्षांपासून डेट करत होते. अखेर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. आता लग्नानंतर अभिनेता पियुष रानडेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. एका नामवंत वृत्त वाहिनीला त्याने मुलाखत दिली आहे.
या मुलाखती दरम्यान तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकलेला पियुष रानडे म्हणाला कि, ‘तुमच्या चांगल्या किंवा वाईट वेळी आपल्यासोबत असलेले कुटुंबीय आणि मित्रपरिवार आपल्याला सर्वांसोबत संवाद साधण्याची अनुमती देतात. आणि तुम्ही सांगू शकता की, ते तुमच्यासाठी आनंदी आहेत’.
अभिनेता पियुष रानडेच्या वैवाहिक आयुष्याविषयी बोलायचं तर, हे त्याच तिसरं लग्न आहे. याआधी त्याच पहिलं लग्न शाल्मली तोळेसोबत झालं होतं. पण काहीच वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर त्याच दुसरं लग्न अभिनेत्री मयुरी वाघसोबत झालं आणि हे लग्नसुद्धा फार काळ टिकलं नाही. आता पियुषने सुरुचीसोबत तिसरं लग्न करून पुन्हा संसाराचा घाट घातला आहे.