‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्री झाल्या राम नामात दंग’; भजन गायनाचा व्हिडीओ व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजचा दिवस हा अत्यंत पावन आणि स्वप्नपूर्तीचा, आनंदाचा दिवस आहे. गेली अनेक वर्ष संपूर्ण देश ज्या दिवसाची वाट पाहत होता आज तो दिवस उजाडला आहे. अयोध्येत प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आज २२ जानेवारी २०२४ रोजी पार पडतो आहे. या सोहळ्याचा संपूर्ण देशभरात उत्साह पहायला मिळतो आहे. देशभरातील जनता राम भक्तीत लीन झाली आहे. आजच्या या पावन दिवसानिमित्त अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. दरम्यान राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि तितिक्षा तावडे यांनी एक खास व्हिडीओ बनवला आहे.

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी मिळून एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघीही राम नामात दंग झाल्याचे दिसून आले आहे. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. त्यामुळे हा व्हिडिओदेखील त्यांनीच सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या नारकर आणि तितिक्षा तावडे राम भजन गाताना दिसत आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये ‘जय श्री राम’ असे लिहिले आहे. ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत ‘जय श्री राम’ म्हटले आहे. दोघींच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सध्या ऐश्वर्या नारकर आणि तितिक्षा तावडे दोघीही झी मराठीच्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या लोकप्रिय कार्यक्रमात एकत्र काम करत आहेत. या मालिकेत ऐश्वर्या नारकर नकारात्मक भूमिकेत तर तितिक्षा मध्यवर्ती भूमिकेत दिसत आहे.