Aishwarya Narkar | वयाच्या 50 व्या वर्षी देखील सुंदर आणि फिट दिसण्याचे ‘हे’ आहे सिक्रेट, ऐश्वर्या नारकर यांनी केला खुलासा


Aishwarya Narkar | मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी आज वयाची पन्नास वर्षे पूर्ण केली आहे. तरी देखील त्यांचा फिटनेस आणि सौंदर्य एखाद्या तरुणीला लाजवेल, असाच आहे. परंतु आजही त्यांच्या फिटनेसचे नेमके रहस्य काय? असा प्रश्न अनेक चाहतांना पडतो अशातच ऐश्वर्या यांनी त्यांच्या सौंदर्याचा सिक्रेट शेअर केले आहे.

ऐश्वर्या नारकर या गेल्या वीस वर्षापासून न चुकता दररोज जिम करतात वेट ट्रेनिंग आणि योगा करत आहे. तसेच त्याच्या जोडीला त्या पौष्टिक आहार देखील घेतात.

ऐश्वर्या नारकर | Aishwarya Narkar

ऐश्वर्या नारकर यांनी सांगितले की, “माझा दिवस सकाळी साडेपाच वाजता सुरू होतो. आणि शूटिंगला जाण्याची तयारी करून त्यानंतर रोज अंदाजे 30 ते 40 मिनिटे मी योगा करते. ज्यामुळे मला मनःशांती मिळते. मी माझ्या पुतणीकडून योगा शिकले आहे. ती एक योग प्रशिक्षक आहे. मी व्यायाम करण्यासोबतच पौष्टिक आहार देखील घेते. गव्हाचे आणि तळलेले पदार्थ मी शक्यतो टाळते. माझे सगळे पदार्थ मी शुद्ध तेलामध्ये करते. लहानपणापासून मी भात तर खातेच माझ्या सगळ्यांना हेच सांगणं आहे की लहानपणीच्या सवयी मोडू नका. आपल्या आयुष्यात समतोल आणि सातत्य ठेवलं की, आपला आरोग्य देखील नीट राहतं. योग्य झोप पौष्टिक आहार आणि व्यायाम हाच माझ्या निरोगी राहण्याचा खरा मंत्र आहे.

हेही वाचा – प्रेक्षकांना भावला ‘मराठी पोरीं’चा स्वॅग; ‘झिम्मा 2’च्या पहिल्या गाण्याचं सोशल मीडियावर धुमशान

ऐश्वर्या नारकर यांनी आत्तापर्यंत अनेक मालिका तसे चित्रपटात काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या त्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत त्या खलनायकाचे काम करत आहेत. त्यांची ही भूमिका त्यांच्या चाहत्यांना देखील खूप जास्त आवडत आहे.

त्याचप्रमाणे ऐश्वर्या नारकर या सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्यांचे व्यायाम करतानाचे व्हिडिओ, रिल्स तसेच त्यांचे फोटो शेअर करून त्या त्यांच्या आयुष्याबद्दल अपडेट त्यांच्या चाहत्यांना देत असतात.