मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. ज्यातून नेहमीच प्रेक्षकांना एक सामाजिक संदेश मिळत असतो.असा आता देखील असाच एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्याचे नाव आहे सत्यशोधक. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा चालू आहे.
सत्यशोधक हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. अशातच सरकारमधील अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी या चित्रपटाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. हा चित्रपट 5 जानेवारी रोजी होणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती सावित्रीबाई फुले यांची संघर्षमय कहानी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राज्य सरकारच्या वित्त विभागाने सत्यशोधक चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री दाखवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
हेही वाचा – ‘तुम्ही दिलेला शब्द पाळलात..’; प्रसाद ओकच्या नव्या घरी वास्तुशांती पूजेला CM एकनाथ शिंदेंची हजेरी
नुकतीच काही दिवसापूर्वी सत्यशोधक या चित्रपटाचा ट्रेलर देखील मोठ्या प्रमाणात उत्साहाने लॉन्च झालेला आहे. यावेळी चित्रपटातील प्रमुख कलाकार संदीप कुलकर्णी आणि तेजस राजश्री देशपांडे यांनी देखील चित्रपटातील लॉन्च सोहळ्याला हजेरी लावलेली होती. त्यामुळे या चित्रपटाची चर्चा सर्वत्र चालू आहे.
नुकतेच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात बैठक झाली. आणि या बैठकीत या चित्रपटाबाबत एक निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये या मराठी चित्रपटात राज्य वस्तू आणि सेवा कर कायद्याअंतर्गत आकारले संदर्भ राज्य वस्तू व सेवा करच्या तूर्तास मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजे हा चित्रपटात सगळ्यांना सिनेमागृहात टॅक्स फ्री बघता येणार आहे. म्हणजे या चित्रपटासाठी आता सगळ्यांना कमी पैसे द्यावे लागणार आहे. अजित पवार यांच्या या निर्णयाने सिनेप्रेमींना खूप जास्त आनंद झालेला आहे.