हर हर महादेव!! दिवाळीत आकाश ठोसरने केली केदारनाथ यात्रा; पहा फोटो


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या तुफान गाजलेल्या ‘सैराट’मधला परशा आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. परशाची भूमिका साकारणारा अभिनेता आकाश ठोसर सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. त्याच्या पोस्ट सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो कायम आपल्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देत असतो. पण सध्या आकाश हा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. ते कारण म्हणजे केदारनाथ यात्रा.

सध्या सोशल मीडियावर सेलिब्रिटी मंडळी दिवाळीच्या खास पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. कुणी रांगोळीचे फोटो शेअर करत आहे. तर कुणी फराळाचे फोटो. इतकच काय तर अनेक सेलिब्रिटी मंडळी आपले दिवाळी लूक शेअर करत आहेत. या दरम्यान अभिनेता आकाश ठोसर मात्र केदारनाथ यात्रा करतो आहे. या यात्रेदरम्यानचे फोटो आकाशने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये आकाशने कानटोपी, स्वेटर परिधान केलेले दिसत आहे.

दरम्यान अभिनेता आकाश ठोसरने केदारनाथ मंदिरात जाऊन महादेवाच दर्शन घेतल्यानंतर हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबत त्याने कॅप्शन देताना लिहिलं आहे कि, ‘हर हर महादेव’. त्याच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या पोस्ट अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये ‘हर हर महादेव’ असे म्हटले आहे. आकाश ठोसरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो लवकरच ‘बाल शिवाजी’ या चित्रपटात झळकणार आहे. ज्यामध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे.