हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून अभिनेत्री अक्षया नाईक हि ‘लतिका’ हे पात्र साकारत आहे. लतिकावर प्रेक्षक मंडळी प्रचंड प्रेम करत असून आता अक्षयाला सर्वाधिक याच नावाने ओळखले जाते. मालिकेतील लतिका आणि अभिमन्यूची जोडी ही लाडक्या जोड्यांपाइकी एक आहे. पण लतिकाचा म्हणजेच अक्षयाचा चाहता वर्ग फार मोठा आहे. अक्षया सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते आणि नुकताच तिने तिच्या वडिलांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांच्या हाताला दुखापत झाल्याचे दिसले आहे.
अभिनेत्री अक्षया नाईकने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचे वडील सोफ्यावर बसलेले दिसत आहे. पण त्यांच्या हाताला प्लास्टर घातलेले दिसत आहे. तसेच आर्म स्लिंग पाउच देखील दिसतो आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या पायावरदेखील किरकोळ जखम झालेली दिसत आहे. त्यांची अवस्था पाहून त्यांचा हात फ्रॅक्चर झाला असावा, असे वाटत आहे. या व्हिडीओवर ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ असं अक्षयाने लिहिले आहे. तर कॅप्शनमध्ये, ‘आता ते ठिक आहेत. त्यांच्यासाठी प्रार्थना करा’ असं लिहिलं आहे.
खरतर दुखापत गंभीर आहे पण व्हिडिओमध्ये अक्षयाचे बाबा इतके खंबीर दिसत आहेत कि त्यांना पाहून चाहत्यांनाही धीर आला असेल. या व्हिडीओमध्ये तिचे बाबा ‘शहंशाह’ चित्रपटाचे टायटल ट्रॅक गाताना दिसत आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी विविध कमेंट करत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. तसेच अनेक नेटकऱ्यांनी ‘काय झालंय..?’, ‘असं कसं झालं..?’ असे प्रश्नही विचारले आहेत. अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये अक्षयाला धीर देत म्हटले आहे कि, ‘ते लवकर बरे होतील… काळजी करू नको’, ‘लवकरच सगळं ठिक होईल. बाबांची काळजी घे’.