‘कन्यादान’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई सुरु; Bride To Be पार्टीचे फोटो झाले व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यात अनेक मराठी कलाकार लग्न बंधनात अडकले. तर काही कलाकार मंडळींनी साखरपुड्याची गोड बातमी दिली. तर काहींनी प्रेमाची कबुली दिली. यामध्ये ‘कन्यादान’ फेम अमृता बने आणि अभिनेता शुभंकर एकबोटे यांचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा पार पडला. यानंतर आता लवकरच दोघे लग्न बंधनात अडकणार आहेत. दरम्यान, अमृताने नुकतीच Bride To Be एन्जॉय केली आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आजकाल लग्नाआधी मुली आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींसोबत Bride To Be पार्टी करतात. अमृतानेदेखील तिच्या मित्र मंडळींसाठी अशाच एका पार्टीचे आयोजन केले होते. अमृताने या पार्टीचे फोटो तिच्या सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंसोबत अमृताने एक पोस्टदेखील शेअर केली आहे. यामध्ये तिने लिहिले आहे कि, ‘मी बंधनात अडकत असले तरी आम्ही एकमेकांना भेटण्याचे, योजना बनवण्याचे, चिडवण्याचे, आणखी आठवणी निर्माण करण्याचे आणि बरेच काही करण्याचे वचन दिले’.

अमृताने शेअर केलेले फोटो पाहून ही Bride To Be पार्टी निसर्गाच्या सानिध्यात एका सुंदर ठिकाणी पार पडल्याचे दिसत आहे. या खास पार्टीसाठी अमृताने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. ज्यामध्ये ती फार सुंदर दिसत होती. अमृताच्या या खास पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. अमृता आणि शुभंकर दोघेही ‘कन्यादान’ मालिकेत एकत्र काम करत होते. या मालिकेच्या सेटवर त्यांची भेट झाली, मैत्री झाली आणि त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. आता लवकरच ते एकेमकांसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.