हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। उद्या दिनांक १८ नोव्हेंबर २०२३ रोजी मराठी अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांचा शुभविवाह सोहळा आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातून हि जोडी लोकप्रिय ठरली. आधी मैत्री, त्यानंतर संवाद आणि मग प्रेम अशी एक एक पायरी चढत उद्या हि जोडी विवाह बंधनात अडकण्यास सज्ज झाली आहे. सध्या देशमुख आणि जवादे अशा दोन्ही घरात लगीनघाई सुरु झाली आहे. त्यांच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरूवात झाली असून अमृताच्या मेहंदी सोहळ्यातील काही फोटोनी सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतले आहे.
यावेळी अमृताने तिच्या मेहंदी सोहळ्यासाठी पिवळ्या रंगाचा भरजरी लेहंगा, फुलांचे दागिने परिधान करत सुंदर असा लूक केला होता. तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दरम्यान अमृताच्या हातावर काढलेली मेहंदी पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. एकीकडे प्रसाद जवादेने होणाऱ्या बायकोसाठी हातावर मेहंदी काढून त्यात खास संदेश लिहूल घेतला. तर दुसरीकडे अमृताने त्यांच्या नात्याची सुरुवात झाली त्या बिग बॉसच्या घरातील महत्वाचा क्षण हातावर रेखाटून घेतला.
प्रसादने हातावर ‘अमृतमय जाहलो…’ असा संदेश हातावर लिहून घेतला आहे. तर दुसरीकडे अमृताच्या हातावर मेहंदीच्या डिझाईनमध्ये ‘बिग बॉस’च्या घरात तिने प्रसादबरोबर एकत्र एंट्री घेतली तो क्षण रेखाटण्यात आला आहे. सोबतच अमृताने मेहंदीत ‘बिग बॉस’चा लोगोदेखील रेखाटून घेतला आहे. या डिझाईनमध्ये अमृता आणि प्रसादची जोडी रेखाटली असून त्यांच्या हातात बिग बॉसच्या नेमप्लेट दिसत आहेत. अशी सुंदर मेहंदी काढून अमृताने एका गोड आठवणीला उजाळा दिला आहे. मुख्य म्हणजे ही मेहंदी काढण्यासाठी तिला तब्बल ४ तास लागल्याचे तिने स्वतः फोटोंच्या कॅप्शनमध्ये नमूद केले आहे. पण ही मेहंदी पाहिल्यावर ४ तास सार्थकी लागले असे म्हणायला हरकत नाही.