बॉलिवूडच्या ट्रेंडिंग गाण्यावर अमृता फडणवीसांचा डान्स; नेटकरी म्हणाले, ‘आता बास्स!! 500 रुपये देतो पण…’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. विविध राजकीय तसेच मनोरंजन संबंधित कार्यक्रमांना त्या आवर्जून हजेरी लावताना दिसतात. अमृता फडणवीस या त्यांच्या गायनाची आवड जोपासताना दिसतात. आतापर्यंत त्यांची अनेक गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली वाईट. ज्यावरून अनेकदा त्या ट्रोल झाल्या पण त्यांनी गाणं सोडलं नाही. याशिवाय त्यांच्या रिल्स व्हिडीओ, फोटो, गाण्यांचे व्हिडीओ तर कायम चर्चेत असतात. आताही त्यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय आणि यावर ट्रोलिंग देखील सुरु झालं आहे.

अमृता फडणवीस या सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. त्यांचे फोटो, व्हिडीओ कायम सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. अशातच नुकताच त्यांनी सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्या बॉलिवूड सिनेविश्वातील लोकप्रिय गाण्यावर थिरकताना दिसल्या आहेत. या व्हिडीओमध्ये अमृता यांनी करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील ‘व्हॉट झुमका’ या लोकप्रिय गाण्यावर डान्स केला आहे. गाडीत बसूनच त्यांनी गाण्याच्या हुक स्टेप केल्या आहेत आणि हा व्हिडीओ शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर थोडंसं मनोरंजन…’.

अमृता फडणवीस यांच्या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, ‘५०० रुपये देतो पण पोस्ट डिलीट करा बाई..’. तर आणखी एकाने लिहिलं, ‘असले चाळे करू नका तिकड फडणवीस जीव बिव देईल’. अन्य एकाने म्हटलं, ‘बाई तुझं वय काय तु करते काय..?’ तर आणखी एकाने लिहिलं, ‘मामी तुमचं गाणं एकल्यापासून आमची म्हैस दूध देईना’. अन्य एकाने म्हटलं, ‘हिच्या एक नवऱ्याला कोण पॉलिटिक्स मध्ये आणलं काय माहित. बाई बिघडलीच. नाहीतर आधीच काळीच बरी होती. प्लास्टिक लावू लावू गोरी होऊन कितीपण व्हिडीओ काढलं तरी आमी त्या आधीच्या तोंडाला नाही विसरणार’. आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, ‘परमेश्वर देवेंद्र फडणवीस यांना अधिकाधिक सहनशक्ती प्रदान करो, हीच प्रार्थना!!’ तर काहींनी अमृता यांच्या हनुवटीवरून त्यांना ट्रोल केलं आहे.