तेव्हाच हा त्रास सुरू झाला..!! अमृता खानविलकरला झालाय ‘हा’ गंभीर आजार; 2 महिन्यांपासून घेतेय उपचार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वाची चंद्रमुखी म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकरचा चाहता वर्ग फार मोठा आहे. सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. शिवाय ती स्वतः सोशल मीडियावर फार सक्रिय असल्यामुळे तिचा आणि चाहत्यांचा बराच संपर्क आहे. आजपासून सुरु झालेल्या नव्या वर्षानिमित्त अनेक कलाकार मंडळीनी विविध पोस्ट शेअर केल्या. अशीच एक पोस्ट अमृताने शेअर केली. मात्र तिची पोस्ट पाहून चाहते चिंतेत पडले आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून अमृता खानविलकर काही गंभीर आजारांचा सामना करत असल्याचे तिने आपल्या या पोस्टमध्ये म्हटले आहे. अमृताने या आजरांविषयी माहिती देणारी हि पोस्ट अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. इंस्टाग्रामच्या स्टोरीवर तिने हि पोस्ट शेअर करत सर्वाना आपल्या आजारपणाची माहिती दिली आहे. हि पोस्ट शेअर करताना अमृताने स्वतःचा एक फोटो शेअर करत त्यावर कॅप्शन लिहिताना याविषयीची माहिती दिली आहे. अमृताने या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यू आणि ब्राँकायटिस या आजारांचा मी सामना करत आहे. या काळात खरंच खूप त्रास झाला’.

पुढे लिहिलंय, ‘मी काहीतरी नवीन करू शकते असं ज्या क्षणी वाटलं तेव्हाच हा त्रास सुरू झाला.. पण यामुळे मी धीराने उभी राहायला शिकले. वर्षाचा हा शेवटचा दिवस मला माझ्या पद्धतीने साजरा करायचा आहे. आपण आहे तसं राहिलो की, सगळेजण आपलं अनुकरण करतात. तुम्ही सुद्धा आयुष्यात संघर्ष करत असाल, तर माझ्यावर विश्वास ठेवा आणि सगळ्यात आधी स्वत:चा विचार करा आणि धीर धरा. सगळं काही ठिक होईल. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!’ अमृता लवकर बरी व्हावी म्हणून तिचे चाहते आता प्रार्थना करू लागले आहेत.