जस्ट लुकिंग लाईक Wow!! मॉरिशसच्या बीचवर अमृता खानविलकरचं मोहक फोटोशूट; चाहते पडले प्रेमात


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वाची चंद्रमुखी अर्थात अभिनेत्री अमृता खानविलकर कायम सोशल मीडियावर सक्रिय दिसते. या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. तिचे अनेक फोटो तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधताना दिसतात. अशातच अमृताने तीच नवं फोटोशूट शेअर करत चाहत्यांना पुन्हा एकदा प्रेमात पाडलं आहे. अमृता मॉरिशस सुट्ट्या एन्जॉय करतेय आणि इथले काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या परदेशी मॉरिशसला फिरायला गेली आहे. दरम्यान सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या अमृताने मॉरिशसच्या समुद्र किनाऱ्यावरचे काही सुंदर फोटो आपल्या चाहत्यांसह शेअर केलेत. अमृताने हे फोटो शेअर करताना कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, ‘खुप भन्नाट ट्रीप. खुप आठवणी. थोडीशी वाळू. खुप सूर्यप्रकाश आणि भन्नाट ट्रीप. मैत्रीणींसोबत केलेली मजा आणि रात्रभर मारलेल्या गप्पा. श्रेया सारखी नवी मैत्रीण मला मिळालीय. मॉरिशियन फूड आणि गोड पदार्थ अत्यंत चविष्ट.. मॉरिशस ही एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला सारखं सारखं यावंसं वाटेल. सध्या तरीही मी निरोप घेतेय मॉरिशसचा पण पुन्हा नक्कीच येईल’.

अभिनेत्री अमृता खनविलकरने शेअर केलेल्या या पोस्टवरून असे वाटते आहे की, तिला मॉरिशस खूपच आवडलं आहे. मॉरिशस मधील निसर्ग, वातावरण, जेवण यांविषयी तिने अगदी भरभरून लिहिल आहे. अमृताने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. अनेक चाहते या फोटोंवर कमेंट करताना अमृताच्या सौंदर्याची तारीफ करत असल्याचे दिसत आहे. अमृताच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचं झालं तर, येत्या काळात तिचा ‘ कलावती ‘ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा एक हॉरर कॉमेडी जॉनरचा चित्रपट असून यामध्ये अमृता खानविलकर सोबत अभिनेता ओंकार भोजने मुख्य भूमिकेत झळकणार आहे.