‘माय हॉटी..’; बॉलिवूडकर दोस्ताच्या वाढदिवशी अमृता खानविलकरची स्पेशल पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज बॉलिवूड सिने विश्वातील अत्यंत उत्साही आणि लोकप्रिय अभिनेता रणवीर सिंगचा वाढदिवस आहे. रणवीर त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा करत असताना सोशल मीडियावर त्याचे चाहते आणि सेलिब्रिटी मंडळी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. या सेलिब्रिटींमध्ये मराठी सिने विश्वातील लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकरचा देखील समावेश आहे. अमृता आणि रणवीर यांची चांगली मैत्री आहे. त्यामुळे हे दोघेही नेहमीच एकमेकांच्या कला कौशल्यांचे कौतुक करताना दिसतात. त्यात आज रणवीरचा वाढदिवस असल्याने अमृताने आवर्जून एक लक्षवेधी पोस्ट शेअर केली आहे.

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हि नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. त्यामुळे ती सोशल मीडियावर विविध लूकमधील फोटो, व्हिडीओ, आगामी प्रोजेक्ट्सची माहिती आपल्या चाहत्यांना देताना दिसते. शिवाय अमृता सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेकदा आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी विविध पोस्ट शेअर करत असते. अशीच एक खास पोस्ट तिने बॉलिवूड कला विश्वातील मित्र रणवीर सिंगसाठी शेअर केली आहे. अमृता खानविलकरने रणवीरच्या वाढदिवसानिमित्त तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे.

हि स्टोरी शेअर करताना अमृताने यामध्ये लिहले आहे कि, ‘माय हॉटी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तुझ्या सारखं कोणीच नाहीये….’. यापुढे अमृताने हॅशटॅग फॅन फॉरेव्हर असेही लिहिले आहे. तसेच या स्टोरीला अमृताने रणवीरचा आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी कि प्रेम कहानी’मधील अरिजित सिंगने गायलेले ‘तुम क्या मिले…’ हे गाणे जोडले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अमृता आणि रणवीर यांची चांगली मैत्री आहे. त्यामुळे अमृताने आपल्या लाडक्या बॉलीवूड अभिनेत्याच्या वाढदिवसासाठी ही खास पोस्ट शेअर केली आहे.