लाडक्या मैत्रिणीच्या वाढदिवशी अम्मूची खास पोस्ट; म्हणाली, ‘मैत्री या शब्दाचा अर्थ…’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अमृता खानविलकर हि मराठी सिनेविश्वाची लाडकी आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. केवळ मराठी नव्हे तर बोलिकवुड सिनेविश्वातही अमृताने अभिनयाची जादू दाखवली आहे. तिचा चाहता वर्ग फार मोठा आहे. अमृताचा मस्त मौलाना स्वभाव तिला इतरांपेक्षा वेगळं सिद्ध करतो. अमृताचे अनेक मित्र मैत्रिणी आहेत आणि त्यांपैकी एक म्हणजे सोनाली खरे. मध्यंतरी एका पॉडकास्टमध्ये अमृताने आपली एकमेव खास मैत्रीण असल्याचे म्हटले होते. ती म्हणजे सोनाली खरे आणि आपल्या खास मैत्रिणीच्या वाढदिवशी अमृताने खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेत्री सोनाली खरे या गेल्या १० वर्षापासून एकमेकींसोबत मैत्रीच्या नात्यात घट्ट बांधल्या गेल्या आहेत. सोनालीची लेक अमृताला ‘अमू मावशी’ म्हणून हाक मारते. असं मैत्रिणींपेक्षाही जास्त जवळ असं या दोघींचं नातं आहे. आज सोनाली खरेचा वाढदिवस आहे आणि यानिमित्त अमृताने खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अमृताने सोनालीसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत आणि आपल्या लाडक्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सुंदर कॅप्शन लिहिलं आहे.

अमृताने लिहिलंय, ‘माय बेबी… तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस. माझ्या वेडेपणाला शांतपणे सहन करणारी माझी लाडकी मैत्रीण! मला कायम समजून घेतल्याबद्दल तुझे खूप खूप आभार.. तू कायम मला खंबीरपणे साथ दिलीस आणि आजच्या घडीला तू माझा सर्वात मोठा आधार आहेस. मला मैत्री या शब्दाचा अर्थ तुझ्यामुळे उमगला. तुझ्या वाढदिवशी मी एकच प्रार्थना करेन की, तुझ्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होवोत. बेबी… तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे हे तुला माहितीच आहे’. या पोस्टवर सोनालीने प्रतिक्रिया देत म्हटलंय, ‘अमुडी मी कायम तुझ्याबरोबर आहे. आयु लव्ह यू’. दोघींमधल्या या खास बॉण्डिंगचे नेटकऱ्यांनादेखील कौतुक वाटत आहेत.