राज ठाकरेंकडून मराठमोळ्या चंद्रमुखीला दिवाळीची खास भेट; अभिनेत्री फोटो शेअर म्हणाली..


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यभरात दिवाळीचा सण सुरु झाला असून सर्वत्र दिव्यांची आरास, रोषणाई, रांगोळ्या, मिठाई आणि फराळ आटोपण्याची लगबग सुरु आहे. दिवाळी हा सण दिव्यांचा, रोषणाईचा असतोच. पण त्यासोबत हा सण असतो चैतन्याचा आणि उत्साहाचा. प्रत्येकाच्या घरात दिवाळी मोठ्या धामधुमीत साजरी केली जाते. लोक एकमेकांना घरी आमंत्रित करतात. फराळ खाऊ घालतात. भेटवस्तू देतात. अशाच भेटवस्तू राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी कलाकारांना पाठवून शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर आता अमृता खानविलकरने तिला राज ठाकरे आणि कुटुंबीय यांच्यातर्फे आलेल्या गिफ्टची झलक दाखवली आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर फार सक्रिय असते. त्यामुळे ती कायम वेगवेगळे फोटो, व्हिडीओ आणि वैयक्तिक गोष्टी या माध्यमातून शेअर करताना दिसते. अमृता एक उत्तम अभिनेत्री आणि तितकीच उत्तम नृत्यांगना आहे. त्यामुळे अमृताच्या कलेवर कायम कौतुकाचा वर्षाव होत असतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कलाप्रेमी आहेत हे आपण जाणतोच. शिवाय ते मराठी कलाकरांना कायम प्रोत्साहन देत असतात. नुकतेच त्यांनी दिवाळीच्या निमित्ताने अभिनेत्री अमृता खानविलकरला खास दिवाळी गिफ्ट पाठवले आहे.

अमृता खविलकरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्राम स्टोरीवर राज ठाकरे यांनी दिलेल्या गिफ्टची झलक दाखवली आहे. या व्हिडिओत आपण एक ग्रीटिंग कार्ड दिसत आहे. ज्यावर लिहिलंय, ‘दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!! श्रीमती मधुवंती श्रीकांत ठाकरे, सौ. शर्मिला आणि राज ठाकरे, सौ. मिताली आणि अमित ठाकरे, कु. उर्वशी राज ठाकरे आणि कियान अमित ठाकरे’. अमृताने भेटवस्तूचा स्वीकार करत राज ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांचे आभार मानले आहेत. तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘राजसाहेब ठाकरे, शालिनी वहिनी, मिताली व अमित ठाकरे तुम्हाला मनापासून धन्यवाद’. अमृता खानविलकरच्या वर्कफ्रंटबद्दल बॊलायचं झालं तर, ती लवकरच ”कलावती” आणि ‘ललिता बाबर’ या बायोपिक चित्रपटात दिसणार आहे.