हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमामुळे तो पुन्हा एकदा हॉट, डॅशिंग, क्लासी आणि कुल लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. बॉलिवूड सिने जगतात रणवीर सिंगची स्वतःच एक वेगळी ओळख आहे आणि तितकाच मोठा त्याचा चाहता वर्ग आहे. पण केवळ बॉलिवूड जगतात नव्हे तर मराठी सिनेविश्वात देखील अनेक मंडळी त्याचे चाहते आहेत. नुकताच त्याच्या आगामी चित्रपटाचा नवा टिझर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये त्याचा डॅशिंग लूक लक्ष वेधून घेतोय. त्याचा हा लूक पाहून मराठमोळी अमृता खानविलकर देखील त्याचे कौतुक करण्यावाचून स्वतःला थांबवू शकली नाही.
‘रॉकी और रानी कि प्रेम कहानी’ या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग हा ‘रॉकी रंधावा’ हे पात्र साकारताना दिसतो आहे. त्याच्या या नव्या पात्राची ओळख करून देणारा एक नवा टिझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यामध्ये रणवीर सिंगने त्याची हॉट बॉडी फ्लोन्ट केली आहे. त्याही फिटनेस, बॉडी कट्स, शेप आणि त्याचा रोमांचकारी अंदाज तरुणींना पागल करतोय. रणवीरच्या या हॉट अंदाजाने एकंदरच सर्वांना थक्क केले आहे. रणवीरने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘रॉकी रंधावाचे मंडे मोटिव्हेशन’ असे लिहिले आहे.
या संपूर्ण व्हिडीओमध्ये रणवीर लूक अतिशय हॉट आणि डॅशिंग दिसतोय. त्याच्या या नव्या टिझर व्हिडिओवर बॉलिवूड जगतातील अनेक सेलिब्रिटी मंडळींनी कमेंट केल्या आहेत. यामध्ये त्याची पत्नी आणि आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा देखील समावेश आहे. याशिवाय मराठी सिनेजगतातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरनेदेखील कमेंट केली आहे. अमृता खानविलकरने रणवीरच्या या व्हिडीओवर आश्चर्य व्यक्त करत लिहिलंय, ‘स्क्रीन इज ऑन फायर, हॉट’. अमृता आणि रणवीर गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना चांगले ओळखतात. इतकेच नव्हे तर ते एकमेकांचे चांगले मित्रदेखील आहेत. त्यामुळे दोघेही आवर्जून एकमेकांचे कौतुक करताना दिसतात.