Amruta Prasad Wedding – शुभलग्न सावधान!! अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे झाले साता जन्माचे सोबती; पहा व्हिडीओ


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Amruta Prasad Wedding) बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे अखेर आज एकमेकांसोबत लग्न बंधनात अडकले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. त्यांच्या केळवणाचे फोटो व्हायरल होत होते. शिवाय ग्रहमख, मेहंदी, हळद आणि संगीत सोहळ्यानंतर आज त्यांचा शुभविवाह पार पडला आहे. नुकताच प्रसाद- अमृताच्या लग्नाची झलक दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(Amruta Prasad Wedding)

अत्यंत जवळचे नातेवाईक आणि मराठी कलाकारांच्या उपस्थितीत प्रसाद आणि अमृता एकमेकांसोबत लग्नबंधनात अडकले. जुलै महिन्यात या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकत थेट लग्नाची तारीख जाहीर केली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. तेव्हापासून चाहते या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. (Amruta Prasad Wedding) प्रसाद आणि अमृताच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर लग्नाचे फोटो शेअर करण्यात आलेले नाहीत. मात्र लग्नाची सुंदर झलक दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. तसेच लग्नाला उपस्थित असलेल्या अभिनेत्री प्रार्थना बेहरेने त्यांचा सप्तपदीचा एक सुंदर व्हिडीओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

प्रार्थनाने शेअर केलेला हा व्हिडीओ त्यांच्या लग्नातीळ सप्तपदी दाखवत आहे. तर प्रसाद- अमृताच्या लग्नाची एक झलक दाखवणारा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. प्रसाद- अमृताच्या लग्नातील त्यांचा लूक अत्यंत साधा आणि पारंपरिक असल्याचे समोर आले आहे. प्रार्थनाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये अमृता आणि प्रसादच्या चेहऱ्यावरील तेज लक्षवेधी आहे. यात अमृताने गुलाबी रंगाचा शालू नेसला आहे. (Amruta Prasad Wedding)

तर प्रसादने पिवळ्या रंगाचा सदरा आणि पांढऱ्या रंगाचं धोतर परिधान केलं आहे. शिवाय लग्नाची झलक दाखवणाऱ्या व्हिडिओत त्यांनी वरमाला सेरेमनी जंगी केल्याचे दिसत आहे. बिग बॉसची ही जोडी अखेर लग्न बंधनात अडकली याचा नेटकरी आनंद व्यक्त करत आहेत. (Amruta Prasad Wedding)