अमृता- प्रसादचं पहिलं केळवण; 87 वर्षीय आजोबांनी केले लाडक्या नातीचे अन जावयाचे कोडकौतुक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वत अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांची केमिस्ट्री जुळली. बिग बॉस मराठीचा सीजन संपला पण हि जोडी मात्र चांगलीच चर्चेत राहिली. यानंतर अमृता आणि प्रसाद यांनी आयुष्यातील अत्यंत महत्वाचा निर्णय घेत एकमेकांना जोडीदार म्हणून निवडले. महिन्याभरापूर्वी २२ जुलै २०२३ रोजी दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकत सोशल मीडियावर थेट लग्नाच्या तारखेची घोषणा केली. येत्या नोव्हेंबर महिन्यात प्रसाद आणि अमृता लग्नबंधनात अडकणार आहेत. तत्पूर्वी दोघांच्या केळवणाला सुरुवात झाली आहे.

अभिनेत्री अमृता देशमुखने तिच्या अधिकृत सोशल मीडियावर पहिल्या केळवणाचे गोड क्षण शेअर केले आहेत. तीच्या पहिल्या केळवणाचा घाट तिच्या ८७ वर्षीय आजोबांनी घातला होता. अत्यंत कौतुकाने आणि थाटात त्यांनी अमृता- प्रसादचं केळवण केलं. अमृता देशमुखने शेअर केलेल्या व्हिडीओत तिच्या संपूर्ण कुटुंबाची झलक पहायला मिळत आहे. यावेळी अमृता आणि प्रसादने हा गोड क्षण फारच एन्जॉय केला. इतकेच नव्हे तर या कजास केळवणानिमित्त असून दोघांनीही एकमेकांसाठी खास उखाणा घेतला आहे.

अमृताने या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘आजोबांनी (आईच्या बाबांनी) वयाच्या ८७ व्या वर्षी सगळं प्लॅनिंग करून, भेटवस्तू, बुके या सगळ्यांनी सजवून केळवणाला सुरवात केली.. एवढं सगळं झाल्यावर मग “उखाणा घ्या” ह्या ऑर्डरला नाकारणार कसं..?’ मग अमृताने उखाणा घेत म्हटलं, ‘नाटकाच्या प्रयोगांसाठी फिरते मी वणवण, प्रसादचं नाव घेते आजोबांनी केलं पहिलं केळवण’. तर प्रसादने उखाणा घेत म्हटलं, ‘कितीही वणवण फिरलीस तरी माझं चित्त फक्त तुझ्यापाशी, अमृताचं नाव घेतो आज केळवणाच्या दिवशी’. त्यांचा हा पहिल्या केळवणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दरम्यान प्रसाद आणि अमृता येत्या १८ नोव्हेंबर २०२३ रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. या दिवसाची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.