शुद्ध, सात्विक आणि रुचकर.. ‘वदनी कवळ’; ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीचे हॉटेल क्षेत्रात पदार्पण


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वरील नुकतीच निरोप घेतलेली लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’मधून खलनायिकेची भुमिका साकारत घरघरात पोहोचलेली अभिनेत्री अनघा भगरे ही सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. या मालिकेत तिने श्वेताची भुमिका साकारली होती. अनघा सोशल मीडियावर खुप सक्रिय असते आणि त्यामुळे तिचे फॉलोवर्स खूप आहेत. गणेशोत्सवानिमित्त अनघाने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनय क्षेत्रानंतर अनघाने आता हॉटेल व्यवसायात पदार्पण केले आहे. गणरायाच्या आगमानानिमित्त तिने हि आनंदाची बाब चाहत्यांसह शेअर केली आहे.

अनघा सुरु करत असलेल्या तिच्या हॉटेलचं नाव ‘वदनी कवळ’ असे आहे. या हॉटेलात लोकांना शुद्ध, सात्विक आणि रुचकर अशा परिपूर्ण थाळीचा आस्वाद घेता येणार आहे. अनघाने सोशल मीडियावर फोटो शेयर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,
‘वक्रतुण्ड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा ॥
असं म्हणतात कुठल्याही कार्याची सुरूवात बाप्पाच्या नावाने करतात. त्यात बाप्पाच्या आगमनाचा दिवस असेल याहुन मंगल दिवस नाही. गेले काही दिवस एकच प्रश्न विचारला जातोए , “आता पुढे काय?” तर यापुढे पुणेकरांच्या ह्रदयात थोड़ी जागा निर्माण करायचं ठरवलयं! मी आणि माझा भाऊ घेऊन येतोए “वदनी कवळ” परिपूर्ण थाळीचा आस्वाद. शुद्ध, सात्विक आणि रुचकर जेवण. In the heart of Pune, Deccan. लवकरच येतयं तुमच्या भेटीला. खूप धाडस करुन हे पाऊल उचलते आहे. अभिनेत्री म्हणून खूप प्रेम मिळालं आता उद्योजिका म्हणून तुमच्या सहकार्याची, प्रेमाची आणि आशिर्वादाची गरज आहे. ।। गणपती बाप्पा मोरया।।’

अनघाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनघाचे चाहते, नेटकरी आणि पुणेकर तिला भरभरून शुभेच्छा देताना दिसत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी तर तिला ‘हॉटेलचं उद्धाटन कधी करणार…?’ असेही विचारले आहेत. यावरून अनघाच्या चाहत्यांची तिच्या हॉटेलबाबतची उत्सुकता दिसून येत आहे. अनघा भगरे ही प्रसिद्ध ज्योतिषी अतुलशास्त्री भगरे गुरुजींची लेक आहे.