हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक विजू माने हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. अनेकदा ते वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. अशातच काल ९ डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा १४ वा वाढदिवस होता. यानिमित्त त्यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. जी प्रचंड व्हायरल झाली. पण विजू मानेंच्या पोस्टपेक्षा जास्त लक्ष त्यांच्या पत्नीच्या पोस्टने वेधून घेतले आहे. यामध्ये अनघा विजू माने यांनी बायकोवर केल्या जाणाऱ्या विनोदांवर भाष्य केलं आहे.
विजू माने यांची हि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवाय विजू माने यांच्या पत्नीने देखील सोशल मीडियावर लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने व्हिडीओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिलं आहे, “१४ वर्ष, वनवासाची , लग्न म्हणजे शहिद होतोय ना तो, बायको म्हणते तर करायला पाहिजे मी किती घाबरतो etc etc….. खूप सारे जोक होत असतात……. खूप अजूनही ऐकतच असते पण ते जोक म्हणूनच घेऊन आपण १४ वर्ष वनवासाची नाही गेली तर खूप भांडणाची, खूप कटकटीची, पण त्यापेक्षा जास्त खूप जास्त समजून घेण्याची, खूप जास्त प्रेमाची आणि नातं घट्ट होण्याची संपली पण अजून खूप वर्ष एकमेकांना सहन करण्याची, मजेत सहवासाची जायची आहेत. माने पुढील बऱ्याच वर्षांसाठी तयार राहा…लग्नाच्या वाढदिवसांच्या खूप शुभेच्छा नवरोबा…खूप सारं प्रेम…’. अनघा यांची हि पोस्ट तुफान व्हायरल झाली असून अनेकांनी यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अनघा यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी विविध फोटो एकत्र केलेला एक कोलाज व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये लग्नाच्या फोटोपासून ते लेकीसोबत धमाल करतानाचा फोटोदेखील दिसतो आहे. लग्नाच्या १४ वर्षात वेगवेगळ्या प्रसंगांना एकत्र सामोरं गेल्याने या जोडप्याचं नातं आणखी घट्ट झालं आहे. अनेकदा विजू माने सोशल मीडियावर बायकोसाठी स्पेशल पोस्ट शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात. दरम्यान विजू माने यांनीदेखील लग्नाच्या वाढदिवशी बायकोचा लग्नाच्या अल्बमसोबतचा फोटो शेअर करत एक सुंदर पोस्ट शेअर केली होती. जी तुफान व्हायरल झाली आहे.