हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रकाश झोतात आलेला अभिनेता ओंकार भोजने प्रेक्षकांना अत्यंत लाडका आहे. हास्यजत्रा सोडल्यानंतर ओंकार ‘फु बाई फु’च्या नव्या पर्वात दिसला. त्यानंतर ओंकार मराठी चित्रपटात देखील झळकला होता. सध्या तो भाऊ कदमसोबत ‘करुन गेलो गाव’ या नाटकात काम करताना दिसत आहे. आपण सारेच जाणतो कि, ओंकार भोजने काव्यप्रेमी आहे. त्याच्या बऱ्याच कवितांचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आताही त्याच्या अशाच एका कवितेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
‘सरला एक कोटी’ या चित्रपटातील अभिनयासाठी ओंकार भोजनेचे अनेक ठिकाणी कौतुक केले गेले. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ओंकारने अनेक ठिकाणी प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. दरम्यान एका कार्यक्रमात त्याने चिपळूण गावाचा उल्लेख असणारी कविता म्हटली होती. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कवितेचे बोल, ‘टॅलेंटची आमच्या गावभर चर्चाssss, नाही खोटेपणाचा आव रे! कुणी निंदा, कुणी भी वंदा.. चिपळूण आमचं गाव रे!!’ असे आहेत. या व्हिडिओवर एका युजरने म्हटले आहे कि, ‘दादा तुम्ही खूप मोठे हाडाचे कलाकार आहात , नक्कीच सिनेमाईल उंच शिखरावर तुम्हाला बघायला आवडेल, तुम्हाला आमचा पूर्ण सपोर्ट आहे. तुमचाच एक चाहता’.
या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या तरुण वर्ग यावेळी ओंकार भोजनेने एकजुटीने राहण्याचे आवाहन केले होते. त्याने म्हटले कि, ‘आपण सर्व तरुण पिढी आता ज्याप्रमाणे एकत्र आहे, तीच उर्जा आणि एकजुट यापुढेही टिकून राहायला हवी. कारण त्यावरच सर्व अवलंबून आहे. एकटं राहून काहीही होत नाही. त्यामुळे आपण एकत्र राहूया’. ओंकार भोजनेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ‘करून गेलो गाव’ या खुसखुशीत नाटकांशिवाय तो लवकरच ‘कलावती’ या आगामी मराठी चित्रपटात दिसणार आहे.