‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत अपूर्वा नेमळेकर साकारणार खलनायिका; नवा प्रोमो आला समोर


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठी सीजन ४’मध्ये धमाकेदार खेळी दर्शवल्यानंतर आता अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नव्या मालिकेतून नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या ४ सप्टेंबर २०२३ पासून ‘प्रेमाची गोष्ट’ हि नवी मालिका सुरु होत आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंसनाळे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यांच्यासह बालकलाकार इशा परवडेदेखील मध्यवर्ती भूमिकेतून आपल्या भेटीस येत आहे. या मालिकेचा नुकताच नवा प्रोमो रिलीज झाला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री अपूर्वा अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत असल्याचे दिसले आहे.

स्टार प्रवाहची आगामी मालिका ‘प्रेमाची गोष्ट’चा नुकताच नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये सागर (राज हंसनाळे) त्याची मुलगी सईला (इशा परवडे) शाळेत सोडायला गेलेला दिसतोय. यावेळी तो लेकीचा प्रोजेक्ट आणायला विसरतो. ज्यामुळे त्याची लेक चिडते. ज्यामुळे सई चिडून पुढे निघून जाते. इतक्यात सईची आई तिथे येते आणि सागरला बोल लगावते. सोबतच ती सईची कस्टडी मिळवणार असा धमकीवजा इशारा देते. पुढे मुक्ता (तेजश्री प्रधान) सईचा प्रोजेक्ट तिला आणून देते आणि सागर, सावनी तिच्याकडे पाहत राहतात.

मालिकेत सागरची पूर्व पत्नी सावनी या खलनायकी भूमिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आपल्याला दिसणार आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका हिंदी मालिका ‘ये है मोहब्बते’चा मराठी सिक्वल आहे. कथानकानुसार, सागर आणि सावनी यांचा घटस्फोट झाला आहे. त्यांना सई नावाची मुलगी आहे जिच्या कस्टडीसाठी हे पालक भांडत आहेत. तर मुक्ता आई होऊ शकत नाही म्हणून तिचं लग्न होत नाहीये. पण तिची आई तिच्या लग्नासाठी प्रयत्न करतेय.

दुसरीकडे सागरची आईदेखील त्याच्या दुसऱ्या लग्नासाठी प्रयत्न करतेय. दरम्यान मुक्ता आणि सई यांच्यात एक मायेचं नातं तयार होत आहे. हे नात पुढे सागरच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होणार का..? हे या मालिकेत पहायला मिळणार आहे.