दादूस झाले आजोबा; अभिनेता अरुण कदम यांच्या मुलीने दिला चिमुकल्या बाळाला जन्म


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून अनेक कलाकार प्रेक्षकांना खळखळून अगदी पोट धरून हसायला भाग पाडतात. यांपैकी एक म्हणजे आपले लाडके दादूस. म्हणजेच अभिनेता अरुण कदम. आज अरुण कदम यांच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा दिवस आहे. कारण दादूसची लेक सुकन्याने सुपुत्राला जन्म दिला आहे. त्यामुळे आता अभिनेते अरुण कदम केवळ दादूस नाही तर दादूस आजोबा झाले आहेत.

अरुण कदम आजोबा झाले असून त्यांची लेक सुकन्या कदम पोवळेने मुलाला जन्म दिला आहे. आज दिनांक १९ ऑगस्ट २०२३ रोजी सुकन्याला पुत्रप्राप्ती झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच अरुण कदम यांच्या लेकीने गूड न्यूज दिली होती. यानंतर जून महिन्यात सुकण्याच्या डोहाळे जेवणाचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. यावेळी अरुण कदम यांच्या चेहऱ्यावर आजोबा होण्याचा आनंद अगदी ओसंडून वाहताना दिसला. प्रतीक्षेनंतर आज बाळाचा जन्म झाला आहे आणि यामुळे कदम व पोवळे कुटुंब प्रचंड आनंदात आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून विविध पात्र साकारत लाडके दादूस अरुण कदम हे प्रेक्षकांना कायम हसवत असतात. आता दादूसची आजोबा म्हणून हसवण्याची जबाबदारी आणखी वाढली आहे. सध्या सोशल मीडियावर हि आनंदाची बातमी वाऱ्यासारखी पसरते आहे आणि चाहते दादूसला आजोबा झाल्याच्या आणि सुकन्याला आई झाल्याच्या शुभेच्छा देत आहेत.

दरम्यान, अरुण कदम यांची लेक सुकन्या कदमचे २०२१ साली सागर पोवाळेशी लग्न झालं. ती स्वतः एक कमर्शिअल आर्टिस्ट आणि ग्राफिक डिझायनर आहे. शिवाय ती भरतनाट्यमही शिकली आहे. सोशल मीडियावर ती अनेकदा वडिलांबरोबरचे विविध रिल्स व्हिडीओ शेअर करताना दिसते.